वट पौर्णिमा निमित्त वडाचे वृषारोपन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 10, 2025

वट पौर्णिमा निमित्त वडाचे वृषारोपन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल

वट पौर्णिमा निमित्त वडाचे वृषारोपन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ..
बारामती:प्रतिनिधी:-मंगळवार दि.१० जून २०२५ रोजी वटपौर्णिमा सर्वत्र साजरी करताना अनेक ठिकाणी वेळे अभावी  वडाची फांदी तोडून त्याचे पूजन करून,त्यास दोरा बांधून व फेऱ्या मारून साजरी करण्याची प्रथा रूढ होत असताना 
घरासमोर किंवा जवळील बागेत ,रस्त्याच्या कडेला  गल्लीत,प्रभागात, वार्डात किंवा शक्य असेल तर शेतात वडाच्या झाडाचे वृषारोपन करून पर्यावरण संतुलन राखले जावे या हेतूने हनुमान नगर महिला बचत गट यांच्या वतीने बारामती शहरात महिलांना वडाचे व सोबत  पेरुचे रोपटे मोफत वाटप करण्यात आले.
या प्रसंगी हनुमान नगर महिला बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना सातव, उपाध्यक्षा हर्षदा सातव व माधवी शेडगे, सीमा सातव, कविता खाडे,माधुरी कुंभार, सुप्रिया पवार,गौरी सावळेपाटील, वीणा फडतरे, प्रियांका जराड,दिपिका नेरकर, सुचेता ढवाण,भारती  शेळके, संगीता साळुंखे, मनीषा खेडेकर, विद्या निंबाळकर आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.
गेली सहा वर्षा पासून सदर उपक्रम राबवत असून वडा चे वृषारोपण केल्याने वड मोठे झाल्यावर प्रचंड सावली देते,मुळ्या पाणी धरून ठेवतात व  परिसरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळते त्यामुळे धार्मिक,शास्त्रीय व पर्यावरण असलेले वडाचे झाड प्रत्येकाने लावावे व त्यास नियमित पाणी द्या त्यानंतर  संगोपन करण्यासाठी मोफत खत व ट्री गार्ड देणार असल्याचे हनुमान नगर बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना सातव यांनी सांगितले अत्याधुनिक व तंत्रज्ञान च्या युगात अनेक महिला नोकरी व्यवसाय करतात वेळेअभावी किंवा काही ठिकाणी वडाचे झाडे नसतात त्या ठिकाणी फोटो चे पूजन केले जाते आशा ठिकाणी परिसरात ,रस्त्याच्या कडेला वडाचे वृक्षारोपण केल्यास संस्कृती व अध्यात्म आणि पर्यावरण जपले  जाईल त्या साठी सदर उपक्रम   करत असल्याचे  बचत गटाच्या सचिव माधवी शेडगे यांनी सांगितले तर आभार ऍड वीणा फडतरे यांनी मानले 


No comments:

Post a Comment