आश्चर्याचा धक्का..माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार; अजित पवार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

आश्चर्याचा धक्का..माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार; अजित पवार

आश्चर्याचा धक्का..माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार; अजित पवार
बारामती :- माळेगाव सहकारी साखर
कारखाना निवडणूक निलकंठेश्वर पॅनेल च्या प्रचाराचा नारळ फुटला, या निवडणुकीच्या रिंगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः अर्ज भरला असून माळेगाव कारखान्याचा
चेअरमन मीच होणार असल्याचे अजित
पवार यांनी जाहीर केले आहे. अजित
पवार यांच्या या भूमिकेने अनेकानी आश्चर्य व्यक्त केले,राज्यात आदर्श म्हणून माळेगाव
सहकारी साखर कारखान्याची ओळख
आहे. यंदाची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक मानले जात आहे, त्याचे कारण ही तसेच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या
निवडणुकीत ब वर्ग प्रवर्गातुन  कारण ही तसेच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या
निवडणुकीत ब वर्ग प्रवर्गातून निवडणुकीस सामोरे जात आहेत.नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून अजित पवार ही निवडणूक लढत आहेत. अजित पवार आज चेअरमन म्हणून
कोणाचे नाव घोषित करणार याकडे
सर्वांचे लक्ष लागले असताना पाहुणेवाडी
तालुका बारामती येथील प्रचार सभेत
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी माळेगाव कारखान्याचा चेअरमन
मीच होणार असे जाहीर केले. यापूर्वी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला
घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात
अजित पवार यांनी आपण प्रचाराच्या
नारळाच्या दिवशीच चेअरमन जाहीर
करणार असल्याचे वक्तव्य केले होते.
त्यानुसार अजित पवार यांनी आज
चेअरमन म्हणून स्वतःचेच नाव जाहीर
केले.

No comments:

Post a Comment