मुख्यमंत्री पदाचे दावेदार कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत,काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली; चंद्रराव तावरे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 15, 2025

मुख्यमंत्री पदाचे दावेदार कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत,काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली; चंद्रराव तावरे

मुख्यमंत्री पदाचे दावेदार कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत,काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली; चंद्रराव तावरे 
बारामती:- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शड्डू ठोकल्यानंतर चांगेलच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीळकंठेश्वर, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचा बळिराजा सहकार बचाव, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती व अपक्षांचा एक पॅनेल,असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून प्रहार करताना यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा
ठेवली? अशी विचारणा केली आहे.
मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा
ठेवली असा थेट सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला आहे.माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फेरी झडू लागलेल्या आहेत.
अजित पवार यांनी काल प्रचार सभेत तावरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर तावरे यांनी आज अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही ? अजित पवारांचे
जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना ते दर का देत नाहीत? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला.

No comments:

Post a Comment