बारामतीत जिल्हा परिषदेतील मुलांना शालेय साहित्य वाटप..

बारामती: --गुरुवार दि. 19-06-2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीरामनगर जळोची येथे आस प्रतिष्ठान व युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो आसोसिएशन तर्फे शालेय विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी बारामती खरेदी विक्री संघांचे संचालक श्री. विनायक गावडे व शंकर नागरी पतसंस्थेचे बारामती शाखा व्यवस्थापक श्री.

गजानन काळे यांनी मुलांशी सवांद साधून त्यांची स्वप्न जाणून घेतली तसेच त्यांना चालू शेक्षणिक वर्षासाठी शुभेच्या दिल्या. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. पंकज भोसले (माळेगावं सहकारी साखर कारखान्याचे संचालक ) यांनी आपल्या मनोगतातून मुलांना संविधानाने दिलेल्या शैक्षणिक शिक्षण घेण्याच्या अधिकाराची आठवण करून दिली व मुलांना मोठे होऊन आपल्या घरच्यांचे व समाजाचे ऋण फेडावे असे सांगितले.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. पाखले मॅडम व सहशिक्षिका सौ. शिंदे मॅडम यांनी मुलांना शिस्त व स्वच्छते विषई मार्गदर्शन केले. व सर्वांचे आभार मानले. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप श्री. मंगेश वेदपाटक व सौ. सुप्रिया जगताप यांनी केले असे आस प्रतिष्ठान चे प्रमुख श्री. गणेश जगताप सर यांनी सांगितले व मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या व संस्थेला भरीव मदत करणाऱ्या सामाजिक बांदीलकी जपणाऱ्या सर्वांचे आभार मानले व अशीच संस्थेला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या प्रसंगी विघ्नहता क्लासेसचे प्रमुख श्री. विकास घुळूमकर व बा. न. पा मा.उपनगराध्यक्ष श्री. अभिजित जाधव यांनी संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
No comments:
Post a Comment