अखिल बारामती ख्रिस्ती संघटनेच्या वतीने आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात पोलीस स्टेशनला निवेदन..
बारामती:- दिनांक 25 /06/2025 रोजी बारामती मधील अखिल बारामती ख्रिस्ती संघटनेच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये ख्रिस्ती समाजाच्या पास्टर्स व ख्रिस्ती सेवकांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन निषेध नोंदविला. याप्रसंगी अखिल बारामती ख्रिस्ती समाजाचे नेते जयकुमार काळे यांनी सांगितले की स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक एका कुटुंबाने केलेल्या गुन्ह्याचा संबंध सबंध समाजाशी कसा काय जोडू शकतात? त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय समाज असून समाजामध्ये अनेक प्रकारे समाज उपयोगी काम करत आलेला आहे. त्यामुळे अशा शांतता प्रिय समाजाच्या धर्मगुरूंच्या विरोधात सुपारी देऊन त्यांचा सैराट करणाऱ्याला म्हणजेच खून करणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस ठेवणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करू देव त्यांना सद्बुद्धी देवो आणि ख्रिस्ती समाजाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलो ही प्रार्थना केली. सदर प्रसंगी बिशप आशिष पंडेला, चर्च ऑफ ख्राईस्ट चे सेक्रेटरी राजेश जाधव,पास्टर कमलेश बनसोडे, पास्टर राजेश गायकवाड, पास्टर विनय राठोड, पास्टर ऑलिव्हिअर सिंग, पास्टर सचिन वागळे, पास्टर सुनील जाधव, पास्टर जॉय जाधव, पास्टर बाळासाहेब जाधव, ब्रदर दीपक जाधव उपाध्यक्ष चर्च ऑफ ख्राईस्ट बारामती, ब्रदर सचिन जाधव, ब्रदर विवेक साळवी, ब्रदर क्रॉस, डॉक्टर मॅथ्यू, ब्रदर कुचेकर, ब्रदर कुंदन साळवी, ब्रदर शशिकांत वागळे, ब्रदर बिपिन जाधव, ब्रदर संजय कुचेकर शौर्य काळे, चव्हाण सर,अनिश जाधव, तनिष गायकवाड, यश माने, यश गायकवाड व इतर ख्रिस्ती समाजातील नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment