बारामतीत अपघाताचे सत्र सुरूच,पुन्हा अपघातात दोघांचा जीव गेला..
बारामती:- बारामतीत गेल्या काही दिवसात अनेक अपघात घडले कुणी जखमी झाले तर कुणाला भयानक अवस्थेत जीव गमवावा लागला असून याची ताजी असतानाच पुन्हा बारामती-पाटस पालखी मार्गावर अपघात झाला असून दोन दुचाकी एकमेकांना धडकून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मागील आठवड्यात याच महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा अपघाताची
घटना आहे.शरद दत्तात्रय मोरे (वय ३६, रा. सोनवडी सुपे ता. बारामती) आणि ज्ञानेश्वर बबन
वलेकर (वय ४२, रा. दहीगाव ता.माळशिरस जि. सोलापूर) अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की.आज दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बारामती-पाटस पालखी मार्गावरून शरद मोरे हे
स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. एमएच ४२ व्ही
३२१९) बारामतीकडे निघाले होते. तर
ज्ञानेश्वर वलेकर हे आपल्या पत्नीसह
अॅक्टीव्हा दुचाकीवरून (क्र. एमएच १४
जेजी ९२०६) बारामतीकडून पाटसच्या
दिशेने निघाले होते.जराडवाडी गावाच्या हद्दीतील आठवा मैलनजीक या दोन्ही दुचाकींची
समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये शरद
मोरे आणि ज्ञानेश्वर वलेकर या दोघांचा
जागीच मृत्यू झाला. तर वलेकर यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी अक्कामाई ज्ञानेश्वर वलेकर (वय ३९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच
बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी
भेट दिली.मागील आठवड्यात याच मार्गावरील
शिर्सुफळ फाटा येथे झालेल्या अपघातात
दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज
पुन्हा अपघात होऊन दोघांना आपला
जीव गमवावा लागला.यामुळे या रस्त्यावर अपघात घडत असल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोकवस्तीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
No comments:
Post a Comment