बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 22, 2025

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन..

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन..
बारामती, २२ जुलै २०२५ : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. श्री अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय,
बारामती येथे भव्य रक्तदान शिबीर, महिलांसाठी रक्तवाढीच्या मोफत गोळया व औषधांचे वाटप, अपंग रुग्णांसाठी मोफत वॉकर वाटप, वृध्द व अपंग रुग्णांसाठी मोफत व्हील चेअर वाटप अशा विविध रुग्णकल्याण विषयक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वरील सर्व रुग्णकल्याण विषयक सामाजिक कार्यक्रमासाठी श्री आदिल्य गोगटे, मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा बारामती तसेच अॅड श्रीनिवास वायकर, सुप्रसिध्द कायदेतज्ञ, बांधकाम व्यावसायिक श्री.अजयभैय्या फराटे युवा उद्योजक, श्री. सुरेश बापू परकाळे, प्रो. प्रा. स्वराज फर्निचर, श्री विशाल हिंगणे, युवा
उद्योजक तसेच श्री जय पवार, चेअरमन संहिता प्रतिष्ठाण व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला.सदर विविध कार्यक्रमाचे सकाळी १०.३० वा. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली मा.श्री. हनुमंत पाटील, उपजिल्हाधिकारी तथा विभागीय अधिकारी (MIDC) यांच्या हस्ते पार पडले. सदर
कार्यक्रमास वरील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत वॉकर वाटप,वृध्द व अपंग रुग्णांसाठी मोफत व्हील चेअर वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर व गोर-गरीब महिलांसाठी रक्तवाढीच्या मोफत गोळया व औषधांचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री बालाजी चांडोळकर, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन श्री. नंदकुमार कोकरे, प्रशासकीय अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमास डॉ. प्रज्ञा भालेराव,उपअधिष्ठाता (पदवीपुर्व), डॉ. अंजली शेटे, प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. सुरज जाधवर,सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र विभाग, डॉ. सौरभ मुथा, सहाय्यक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जेधे तसेच सर्व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमासाठी मा.उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. सचिन यादव, स्वीय सहायक श्री
बाळराजे मुळीक व निवासी स्वीय सहायक श्री. नितीन हाटे यांनी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या तसेच मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment