बारामती:-बारामती ही विकसित होत असताना गुन्हेगारी देखील वाढत असल्याचे मागील काही घटने वरून दिसून आले असले तरी मात्र त्यामध्ये काही केल्या सुधारणा होत नसल्याचे सामान्य नागरिकांनी खंत व्यक्त केली, जुगार, अवैध दारू, गुटखा,अवैद्य प्रवासी वाहतूक, मटका, ऑनलाइन मटका, नशा येणारे इंजेक्शन ,गांजा असले अवैध धंदे बारामती व बारामती तालुक्यात राजरोसपणे चालू असल्याचे पहावयास मिळत असल्याचे बारामतीकर बोलताना दिसत आहे, मात्र किरकोळ कारवाई दाखवून पुन्हा हे धंदे राजरोस पणे वाढत आहे यातून गुन्हेगार घडत असून त्यामुळे खून, खुनाचा प्रयत्न ,चोऱ्या असले प्रकार घडत आहेत याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना देखील अवैध धंदे बाबत तक्रार देणार असल्याचे कळतंय,झपाट्याने विकसित होत असलेल्या बारामती ग्रामीण भागात वाढती गुन्हेगारी हे घातक ठरत असून यावर कडक कारवाई होणं गरजेचं असताना मात्र तसे दिसून येत नाही हे दुर्देव असल्याचे देखील प्रतिक्रिया उमटत आहे.सर्वत्र अवैध धंद्याचा गाजा वाजा.. कधी वाजणार त्याचा बाजा..!
Post Top Ad
Wednesday, July 16, 2025
सर्वत्र अवैध धंद्याचा गाजा वाजा..कधी वाजणार त्यांचा बाजा..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment