पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सांसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्वे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन व त्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवाजीनगर मतदार संघातील प्रभाग क्रमांक ७ चे माननीय नगरसेविका सौ आशाताई राजेश साने व शिवाजीनगर मतदार संघ कार्याध्यक्ष राजेश साने यांच्याकडून बॅग वह्या पुस्तके व अनेक शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले जवळ पास 1200 ते 1500 विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता सर्वात जास्त परिश्रम घेणारे नगरसेविका आशाताई साने व कार्याध्यक्ष राजेश साने व बाळूभाऊ देवकुळे व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्ष) पदाधिकारी सहकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाकरिता शिवाजीनगर मतदार संघातील अनेक मान्यवर यांच्या हस्ते सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला त्यावेळी(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) बारामतीचे शहर उपाध्यक्ष मा नितीन पारकर हे देखील उपस्थित होते व त्यांच्या हस्ते देखील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment