गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आनंदात संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 14, 2025

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आनंदात संपन्न..

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आनंदात संपन्न..
बारामती:-11 ऑगस्ट 2025 रोजी बारामती येथील प्रो किड्स इंटरनॅशनल या अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये अकॅडमी चे माजी विद्यार्थी तनिष्क नारायणकर व युवराज नारायणकर या बंधूंनीJEE परीक्षेत यश मिळवून IIT Bombay तर आर्या ढाणे या विद्यार्थिनीने CET परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. प्रो किड्स इंटरनॅशनल या अकॅडमी मध्ये आमचा पाया पक्का झाला. अबॅकस मुळे कॅल्क्युलेशन्स अल्पावधीत करता आले. त्यामुळे वेळ वाचला व जास्तीत जास्त प्रश्न सोडवता आले. सोडवलेले सर्व प्रश्न पुन्हा तपासता आले म्हणून आम्ही हे यश मिळवू शकलो असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमा वेळी  यशस्वी करिअर या विषयावर संतोष खवळे तर आजच्या विद्यार्थ्यांप्रती पालक व शिक्षकांची जबाबदारी या विषयावर ॲड. अक्षय शितोळे- देशमुख या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रो किड्स इंटरनॅशनल या अकॅडमीमुळे मुलांचा आत्मविश्वासाबरोबर त्यांची स्मरणशक्ती सुद्धा प्रचंड वाढत आहे. तसेच स्पीड रायटिंग, स्पीड रीडिंग, हॅन्ड रायटिंग इम्प्रूमेंट प्रकारच्या कोर्सेसमुळे मुलांमध्ये अमुलाग्र बदल होत असल्याचे जाणवते असे मत कार्यक्रमांमध्ये उपस्थित असणाऱ्या पालकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो किड्स इंटरनॅशनल च्या संचालिका सौ प्रवीणा आगवणे तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

No comments:

Post a Comment