१४ ऑगस्ट रोजी वंदेमातरम चौक (भिगवण चौक) बारामती येथील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर होऊ नये म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 12, 2025

१४ ऑगस्ट रोजी वंदेमातरम चौक (भिगवण चौक) बारामती येथील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर होऊ नये म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण..

१४ ऑगस्ट रोजी वंदेमातरम चौक (भिगवण चौक) बारामती येथील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर होऊ नये म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण..
बारामती:बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना बारामती व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना बारामती.
वार गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी वंदेमातरम चौक (भिगवण चौक) बारामती येथील हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर होऊ नये म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण बारामती तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी व त्यांचे उत्तराधिकारी करणार आहेत. तरी सदरील कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,उपस्थित राहून आपण आपल्या पक्षाचा पाठींबा द्यावा.
          तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, गणेश मंडळ, दहीहंडी संघ, व बारामतीतील सर्व देश प्रेमी नागरिक बंधू भगिनी,
         आम्ही आपणास विनंती करतो कि सर्व देशप्रेमी नागरिकांनी या राष्ट्रीय पुण्य कार्यात या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन आम्हाला सहकार्य व प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना बारामती व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना बारामती यांनी केले.

No comments:

Post a Comment