दि.९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त टकारी ट्रायबल कम्युनिटीज् वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हास्तरीय परिषद आयोजित..
दिनानिमित्त जिल्हास्तरीय परिषद टकारी ट्रायबल कम्युनिटीज् वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट् या संघटनेच्या शाखा उखंडा ता. पाटोदा जि. बीड येथे शाखा अध्यक्ष मच्छिंद्र दशरथ गायकवाड, शाखा उपाध्यक्ष मसु आश्रुबा गायकवाड, व शाखा सचिव तानाजी दशरथ गायकवाड यांनी ९
ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय परिषद आयोजित केला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड नामदेव जाधव यांनी मार्गदर्शन केले. २१ जानेवारी २०१९ रोजी पुण्यामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे मोर्चा व उपोषण दि. १८ जानेवारी २०२१ रोजी मंत्रालयासमोर व आझाद मैदान येथे उपोषण करुन हि शासन प्रशासने याची काहीही कारवाई केलेली नाही.पारधी जमातीचे पोट जमात असलेल्या टकारी जमातीचा भारतीय संविधान अनुच्छेद ३४२ (१) नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत अणुक्रमांक ३८ वर समावेश करण्याचे प्रकरण २०१६ पासून आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रलंबित आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित निकाली काढून भारत
सरकारला शिफारस करण्यात यावी. असे या परिषदेत टकारी ट्रायबल कम्युनिटीज वेल्फेअर
फेल्फेअर असोसिएशन संस्थापक राज्य अध्यक्ष अँड नामदेव जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. यावेळी उपस्थित विपुल गायकवाड, सुभाष जाधव, दगडु गायकवाड, माऊली गायकवाड, प्रकाश गायकवाड,भिमराव गायकवाड, मनीराम
गायकवाड, देविदास गायकवाड,उखंडा ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गायकवाड, उखंडा गावचे सरपंच संतोष झुणगुरे, जि. प सदस्य प्रकाश कवठेकर, पदाधिकारी व समाज
बांधव हे आहिल्या नगर व बीड जिल्हातुन बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment