अखिल बारामती भोई समाज संस्थेच्या वतीने ३००० हजार शिवभक्तांना साबुदाणा खिचडी, राजगिरा चिक्की,केळी व बटाटा चिवडा यांचे वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 11, 2025

अखिल बारामती भोई समाज संस्थेच्या वतीने ३००० हजार शिवभक्तांना साबुदाणा खिचडी, राजगिरा चिक्की,केळी व बटाटा चिवडा यांचे वाटप..

अखिल बारामती भोई समाज संस्थेच्या वतीने ३००० हजार शिवभक्तांना साबुदाणा खिचडी, राजगिरा चिक्की,केळी व बटाटा चिवडा यांचे वाटप..
बारामती:- अखिल बारामती भोई समाज संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक :- ११/८/२०२५ रोजी पांढरीचा महादेव,पाटस रोड, बारामती येथे दर्शनास येणाऱ्या शिवभक्तांना साबुदाणा खिचडी, राजगिरा चिक्की,केळी व बटाटा चिवडा यांचे वाटप करण्यात आले.
       २००० ते ३००० शिवभक्तांनी याचा लाभ घेतला अखिल बारामती भोई समाज संस्थेचे फराळ वाटपाचे दुसरे वर्ष आहे.शिवभक्त भावीकान कडून दरवर्षी संस्थेला चांगला प्रतिसाद मिळत असतो,
        अखिल बारामती भोई समाज संस्था गेली दोन वर्ष धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक काम उत्तम प्रकारे करीत आहे.ईयत्ता १० वी १२ वी सन :- २०२५  रोजीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समाजा तर्फे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
       अखिल बारामती भोई समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.तसेच अखिल बारामती भोई समाज संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश करंजे व उपाध्यक्ष श्री शंकर मोरे यांचे हस्ते श्री जितेन्द्र गुजर यांनी फराळ वाटपाला विशेष आर्थिक सहाय्य केल्याबद्दल त्यांना समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
        भोई समाजाचे श्री वाडीले कुटुंबाचे चांगले सहकार्य  लाभले अखिल बारामती भोई समाज संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश करंजे व उपाध्यक्ष श्री शंकर मोरे व सहकारी यांच्या हस्ते महादेवांचे पुजन करण्यात आले भोई समाज मोठ्या संख्येने हजर होता.
        या कामी भोई समाजातील व्यक्तीनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment