ऑटो रिक्षा चालकांसाठी बारामती RTO कार्यालयाचे स्तुत्य उपक्रम.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 26, 2025

ऑटो रिक्षा चालकांसाठी बारामती RTO कार्यालयाचे स्तुत्य उपक्रम..


ऑटो रिक्षा चालकांसाठी बारामती RTO कार्यालयाचे स्तुत्य उपक्रम..
बारामती (प्रतिनिधी) - बारामती ऑटो रिक्षा महासंघाच्या वतीने नुकतेच शहरातील 25 ऑटो रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र (ग्रुप पासिंग) करण्यात आले होते त्या सर्व ऑटो रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र सोमवारी (ता. 25) दुपारी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात उप प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी श्री निकम यांच्या हस्ते 25 ऑटो रिक्षा चालकांना देण्यात आले. 
      यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम सोा, सहकारी मोटार वाहन निरीक्षक श्री. चंद्रमोहन साळोखे, वैभव जाधव, सहा. मोटार वाहन निरीक्षक - संजय  भापकर, सागर ठेंगील, मोहन भापकर, तसेच बारामती शहर व तालुका ऑटो रिक्षा महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रशांत (नाना) सातव, पदाधिकारी किशोर कांबळे, अशोक कांबळे, दादा शिंदे यांच्यासाह बारामती टिपर वाहतुक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन मोहिते, उपाध्यक्ष किरण देशमुख, सचिव बाळराजे कुंभार, बारामी मोटार वाहन संघटनेचे प्रतिनिधी श्री. शाकीर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
     याप्रसंगी उपस्थित रिक्षा चालकांनी मार्गदर्शन करताना श्री. निकम म्हणाले सध्या शहरात वाहनांच्या संख्येत झापातटयाने वाढ होताना दिसत आहे. आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. तरी सर्व रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणेबाबत, प्रवाशांबरोबर सोजन्याने वागणेबाबत तसेच आपापल्या गाडींचे पेपर, लायसेन्स, बॅच, परमिट याबद्दल जागरूक राहून सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन केले. 
    बारामतीतील रिक्षा चालकांचे कौतुक करून श्री. सुरेंद्र निकम म्हणाले एकाच वेळी 25 रिक्षा चालकांनी ग्रुप पासिंग करून एक चांगला उपक्रम राबविल्याने समाधान व्यक्त केले. इथून पुढेही सर्व रिक्षा चालकांनी अशा प्रकारे ग्रुप पासिंग करून आपापल्या वाहनांची कागदपत्राची पूर्णता करावी. या चांगल्या उपक्रमास बारामती आरटीओ कार्यालय ही आपणास योग्य ते सहकार्य करेल असेही श्री निकम यांनी सांगितले. 
    दरम्यान ऑटो रिक्षा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत नाना सातव म्हणाले शहरातील ऑटो रिक्षांसाठी निश्चित थांबा नसल्याने चालकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्यासाठी निश्चित थांबा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे यावेळी अधिकारी श्री. निकम यांना सांगितले.
    रिक्षा चालकांना फक्त शासकीय फी स्विकारून श्री. कौशल गांधी यांनी ऑनलाईन कागदपत्रे काढण्याकामी मोलाची मदत केल्याने त्यांचे कौतुक करून श्री. सुरेंद्र निकम उपप्रादेषिक परिवहन अधिकारी बारामती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशसवी रित्या पार पडणे करिता प्रा. डॉ. भीमराव मोरे, सचिव - बारामती-दौंड-इंदापूर रिक्षा कृती समिती, किशोर कांबळे, अशोक कांबळे, दादा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment