बारामती:- येथील रागिणी फाऊंडेशन च्या वतीने अविश्री बालसदन, कुरकुंभ येथे गणेश उत्सवानिमित्त शाडूमाती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये कलाशिक्षक महेंद्र दीक्षित व फाल्गुनी देशपांडे यांनी मुलांना वेगवेगळ्या आकारांपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यामध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या गणपती मूर्ती तयार केल्या. यावेळी दीक्षित यांनी मुलांना शाडू माती पासून बनवल्या जाणाऱ्या गणपतीचे महत्त्व व प्रदूषण याबद्दल मार्गदर्शन केले.
लहान वयापासूनच मुलांना पर्यावरण संवर्धनाची जाणीव व्हावी, स्वतःचे कलाकौशल्य वापरून कलाकृती निर्माण करण्याचा आनंद मुलांना मिळावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे रागिणी फाऊंशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले. या कार्यशाळेमध्ये विविध वयोगटातील मुलांनी सहभाग घेतला होता.
या कार्यशाळेसाठी अविश्री बाल सदनचे सर्वेसर्वा श्री अनिल कटारिया व गणेश फुटाणे यांचे विशेष योगदान लाभले. तर या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रागिणी फाऊंडेशनच्या सदस्य व अविश्री बाल सदन येथील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment