सेवानिवृत्तीचा खर्च टाळून गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 8, 2025

सेवानिवृत्तीचा खर्च टाळून गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप...

सेवानिवृत्तीचा खर्च टाळून गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप...
बारामती :- बारामती येथील तांदुळवाडी ता. बारामती या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून सौ. वनिता दिनकर जाधव हया जि.प. शाळा
कार्यरत आहे त्यांनी सेवानिवुतीचा खर्च टाळून गरजू महिलांना ५ शिलाई मशीन (रक्कम ४०,००० रु) देऊन उपजिविकेचे साधन दिले
त्यांनी विविध उपक्रमात जसे पहीलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थी यांना पाटी पेन्सिल देऊन केले, पिण्याच्या पाण्याची टाकी १५ हजार रुपयाची सिनटेक्सची दिली, शाळेसाठी गोदरेज कपाट, वाढदिवसानिमित्त वहया, पेन शालेय साहित्य, स्वाती हया मुलीचा १ ली ते ७वीपर्यंत सर्व खर्च केला.शाळेचे मुख्याध्यापक श्री. मच्छिंद्रनाथ कोळेकर सर व शिक्षक स्टाफ यांची साथ त्यांना चांगल्या प्रकारे मिळाली.हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर वसंतनगर बारामती गणेश उत्सवामध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमास-श्री अनिल आण्णा जाधव (राष्ट्रपती पदक
विजेता)पो अधिकारी दिनकर आबा जाधव, पो.अधिकारी चंद्रकांत जाधव, पो अधिकारी-श्री सुनिल जाधव,श्री संजय जाधव (मा.विस्तार अधिकारी), शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री सुरेंद्र गायकवाड, राष्ट्रपती पदक-श्री गणेश महादू गायकवाड, मा.नगरसेविका सविता जाधव,अर्चना जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते ओंकार जाधव, महेश गायकवाड
सौरभ जाधव, रितेश गायकवाड, संजय कांबळे व जेष्ठ प्रकाश गायकवाड व कार्यक्रमाचे नियोजन -श्री सयाजी गायकवाड यांनी केले.तसेच शिक्षक संघ सरचिटणीस सौ वैशाली विजय गायकवाड व शिक्षिका सौ वैशाली सुधीर गायकवाड हया उपस्थितीत होत्या.

No comments:

Post a Comment