शासकीय कर्मचारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यास मारहाण केल्याबद्दल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५०००/- रूपये दंड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 8, 2025

शासकीय कर्मचारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यास मारहाण केल्याबद्दल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५०००/- रूपये दंड

शासकीय कर्मचारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यास मारहाण केल्याबद्दल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५०००/- रूपये दंड..
बारामती:- दिनांक ०८/०९/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. ३ मा. हितेंद्र
अनिलकुमार वाणी साो. यांनी आरोपी नाव किरण लक्ष्मण खराडे व आकाश कैलास ताकवणे रा.हिंगणीगाडा ता. दौंड जि. पुणे यांना शासकीय कामात अडथळा आणून मारहाण, व धमकी दिल्याबद्दल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५००० /- रूपये व दंड ठोठावली आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ०४/०१/२०२३ रोजी आरोपी यांनी फिर्यादी
बाळासाहेब हरिशचंद्र चव्हाण तलाठी वासुंदे, हे शासकीय काम करत असताना व शासकीय
काम घेवून एसटी स्टॅंड कडून मंडल अधिकारी पाटस यांचे कडे जात असताना आरोपी किरण
लक्ष्मण खराडे व आकाश कैलास ताकवणे यांनी लोकसेवक तलाठी यांना सरकारी कामात
मारहाण केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे यवत पोलीस स्टेशनला गु.र.नं १३/२०२३ अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली सदरील गुन्हयाचा तपास तात्कालीन
सहायक पोलीस निरिक्षक केशव वाबळे यांनी केला तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.सदरील केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी, पंच, साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविली केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम पाहिले.त्यांचा युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरुन शासकीय कर्मचा-यास अडथळा अणून मारहाण केल्याबद्दल दोन्ही आरोपींना २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५०००/- तसेच धमकी दिल्याबद्दल किरण लक्ष्मण खराडे याला १ वर्षे सश्रम कारावासाची व २००० /- रूपये दंड
शिक्षा सुनवली. सदर प्रकरणी पो.स. ई. गोरख के. कसपटे, यांनी पैरवी अधिकारी म्हणून
कामकाज पाहिले. तसेच त्यास पोलीस हवलदार वेनूनाद ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment