बारामती:- मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता वसंतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते ओंकार जाधव यांनी शोकसभेचे आयोजन केले होते.याप्रसंगी अजितदादांनी वसंतनगर मधील गरजू व्यक्तींना केलेली मदत,वैयक्तिक व सार्वजनिक कामे, कोरोना काळातील कम्युनिटी किचन, शिस्तप्रियता, वक्तशीरपणा,सौंदर्यदृष्टी इत्यादी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, बारामतीचा झालेला सर्वांगीण विकास, दादांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व इत्यादी विषयांचा मागोवा घेत आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी बारामती नगर परिषदेचे गटनेते संजय संघवी, महिला व बालकल्याण सभापती सविता जाधव,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, सुरेंद्र गायकवाड, महेंद्र गायकवाड,पास्टर सुनील जाधव, कल्पना गायकवाड,शंभू गायकवाड यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले प्रमिला जाधव यांनी पसायदान म्हणुन कार्यक्रमाची सांगता केली.
शोक सभेसाठी सयाजी गायकवाड,महेश गायकवाड, गौरव जाधव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी वसंतनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment