धक्कादायक .. बारामती जवळच्या उमेदवाराला पोलीस भरतीदरम्यान रंगेहाथ पकडून अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 23, 2026

धक्कादायक .. बारामती जवळच्या उमेदवाराला पोलीस भरतीदरम्यान रंगेहाथ पकडून अटक..

धक्कादायक ..बारामती जवळच्या उमेदवाराला पोलीस भरतीदरम्यान रंगेहाथ पकडून अटक..
मुंबई:-पोलीस भरती सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला,दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती
प्रक्रियेत पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीपूर्वीच उत्तेजक द्रव्य (ड्रग्ज) घेणाऱ्या एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. यामध्ये बारामतीचा रहिवासी असलेल्या साहिल अवघडे हा ताकद वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेत होता. मात्र सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत या उमेदवाराला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेनंतर आता पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणावर चर्चा सुरू झाली आहे असून यामध्ये अजून माहिती काढण्याचे चालु असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment