ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 15, 2026

ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहायला हवे; १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
अतनूर/प्रतिनिधी:-ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य एवमं  समर्पण करियर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समर्पण करिअर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात जागतिक ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.पांडुरंग बालाजी फड हे होते. तर प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राज्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष तानाजीराव नरहरीराव गुंड, राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे तसेच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्य प्रदेश संघटक तथा मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब शिंदे, प्रा.डॉ.अविनाश प्रभातराव पाटील, प्रा.डॉ.सुनील यशवंतराव ढगे, तालुकाध्यक्ष प्राचार्य व्ही.एस.कणसे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आर.एन.जाधव, प्रा.विकास पाटील उपस्थित होते.
यावेळी समर्पण करियर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, महाविद्यालयीन कॉलेजकुमार, युवक, युवती, तरुणी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्राहक स्वंयसेवक उपस्थित होते. यावेळी १५ मार्च २०२६ रोजी "जागतिक ग्राहक हक्क दिन" (World Consumer Rights Day) साजरा केला गेला., ज्याची मुख्य थीम "सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक" (Safe Products, Confident Consumers) होती., जी उत्पादनांची सुरक्षा, डिजिटल फसवणूक रोखणे आणि ग्राहक सक्षमीकरणावर भर देते. ह्या दिवशी ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल (सुरक्षा, माहिती, निवड, सुनावणी, निवारण, शिक्षण) जागरूकता निर्माण करते. यावेळी ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे यांनी मार्गदर्शनपर तथा तज्ञ व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०२६ ची संकल्पना (Theme): "सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक" व याचे उद्देश असे आहेत. डिजिटल युगात सुरक्षित खरेदी, गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवणे आणि ग्राहक हक्कांचे संरक्षण करणे असे असून महत्त्वाचे ग्राहक हक्क, सुरक्षेचा अधिकार, धोकादायक वस्तूंपासून संरक्षण, माहितीचा अधिकार, वस्तूची गुणवत्ता, किंमत आणि शुद्धता जाणून घेणे, निवडीचा अधिकार, स्पर्धात्मक किंमतीत उत्पादने निवडणे, सुनावणीचा अधिकार, ग्राहक मंचासमोर तक्रार मांडणे, निवारण अधिकार, फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई मिळवणे हे आहेत.

No comments:

Post a Comment