अॅड.तुषार झेंडे यांची CGRF बारामती येथे ग्राहक प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती...
बारामती:- अॅड.तुषार देविदास झेंडे यांची ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF), बारामती सर्कल येथे स्वतंत्र सदस्य (Independent Member) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती Maharashtra Electricity Regulatory Commission, विद्युत नियामक आयोग, मुंबई यांच्या वतीने करण्यात आली आहे.
ही नियुक्ती MERC (Consumer Grievance Redressal Forum and Electricity Ombudsman) Regulations, 2020 व 2024 सुधारित नियमांनुसार करण्यात आली असून, त्यांच्या ग्राहक हक्क आणि वीज कायद्यावरील अनुभवाची दखल घेण्यात आली आहे.
आज श्री. दीपक लहामगे, अधीक्षक अभियंता, बारामती सर्कल, Maharashtra State Electricity Distribution Company Limited यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी देखील अॅड. झेंडे यांचे अभिनंदन करून स्वागत केले.
अॅड. झेंडे हे ग्राहक हक्क, कायदेशीर जनजागृती व सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या नियुक्तीमुळे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना अॅड. झेंडे यांनी सांगितले की, “मी वीज अधिनियम 2003 व MERC नियमांनुसार ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करीन.”
वीज ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल करण्याची विनंती केली आहे.
No comments:
Post a Comment