बारामतीत ज्येष्ठ नागरिकावर हल्ला निवेदनाद्वारे कारवाईची मागणी..
बारामती:-बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी विरोधी पक्षनेते आरती शेंडगे, नगरसेवक अभिजीत चव्हाण तसेच वकील संघटनेच्या वतीने पोलिसांकडे निवेदन देत तात्काळ व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बारामती व्यवसाय निर्देशिका ज्येष्ठ नागरिक आनंद गायकवाड (वय 62) यांच्यावर चार अज्ञात व्यक्तींनी भ्याडपणे जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती नगरपरिषद विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाकडे तात्काळ व कठोर कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी अंदाजे 7.30 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान, शिवाजी चौक ते फलटण रोड दरम्यान पायी जात असताना आनंद गायकवाड यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी निर्दयीपणे हल्ला केला.या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून, हल्लेखोरांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एका ज्येष्ठ नागरिकावर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची
प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हा प्रकार बारामतीतील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे
द्योतक असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. बारामती व्यवसाय निर्देशिका विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित घटनेची तात्काळ व सखोल चौकशी करून आरोपींना लवकरात
लवकर अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच पीडितास तातडीने संरक्षण देऊन न्याय मिळवून द्यावा.यासंदर्भात प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर स्थानिक नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment