शासकीय कर्मचा-यास मारहाण केल्याबद्दल आरोपी दोषी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 4, 2026

शासकीय कर्मचा-यास मारहाण केल्याबद्दल आरोपी दोषी..

शासकीय कर्मचा-यास मारहाण केल्याबद्दल आरोपी दोषी..
बारामती:- दिनांक ०४/०५/२०२६ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश मा.
हितेंद्र उर्मीला अनिलकुमार वाणी सो., यांनी आरोपी नाव नवनाथ तुकाराम बालटकर
रा. लोणारवाडी ता. दौंड जि. पुणे. यांना दोषी धरूण शिक्षा सुनावली.थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २१/०७/२०१२ रोजी दुपारी २.०० वा.फिर्यादी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी शाखा कुरकुंभ याचे वायरमन मोहितपाशा अब्दुल रशिद काझी हे लोणारवाडी येथे गावठाणा लाईटचे कनेक्शन जोडण्यास गेले असता आरोपी नवनाथ तुकाराम बालटकर यांचे घरासमोर मोकळया जागेत मोटारसायकल लावलेच्या कारणावरूण फिर्यादी यांचे गचुंडे धरूण डाव्या
गालात दोन चापटी मारल्या व शिवीगाळ करून अपमानीत केले. व शासकीय कामात अडथळा आणल्याबददल दौंड पोलीस स्टेशनला गु.र.नं १४२ / २०१२ रोजी अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली सदरील गुन्हयाचा तपास तात्कालीन सहा. फौजदार आर. बी. पवार यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.सदरील केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासले त्यामध्ये फिर्यादी व प्रत्यक्षदर्शि साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आली. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम
पाहिले. आरोपी विरूध्द मारहाण केली व आरोपीचा आपमान केल्याबद्दल दोष शाबीत झाल्याने आरोपीस मे. कोर्टाने दोषी धरले व फिर्यादीस ५००० /- रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला व २ वर्षाचा चांगल्या वर्तुणीकीचा बॉन्ड आरोपी कडून लिहून घेण्यात आला व सदर २ वर्षाच्या काळामध्ये आरोपी यांने मे.न्यायालयाचे स्थलसिमा सोडून जायचे नाही, कोणतेही नशा करायची नाही व कोणतेही
नैतीकदृष्टया चुकीचे काम करायचे नाही, कोणासही मारहाण करायचे नाही तसे
केल्यास त्यास कायदयाप्रमाणे शिक्षा देण्याचा हक्क न्यायालयाने राखून ठेवला आहे.सदर प्रकरणी पैरवी अधिकारी गोरख कसपटे, व सहा. फौजदार अभिमन्यु कवडे यांनी म्हणून कामकाज पाहिले. तसेच त्यास पोलीस हवालदार मनिषा अहिवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment