बारामतीत फेसबुकवर "बाजारभावापेक्षा स्वस्त गहू" या मेसेजला भुलले..दोन रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लाखो रुपये लुटले..पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीने आरोपी जेलमध्ये धाडले. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 5, 2026

बारामतीत फेसबुकवर "बाजारभावापेक्षा स्वस्त गहू" या मेसेजला भुलले..दोन रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लाखो रुपये लुटले..पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीने आरोपी जेलमध्ये धाडले.

बारामतीत फेसबुकवर "बाजारभावापेक्षा स्वस्त गहू" या मेसेजला भुलले..दोन रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लाखो रुपये लुटले..पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीने आरोपी जेलमध्ये धाडले.  बारामती:- स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याला बारामतीत बोलावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी केली.सतत ठिकाणे बदलणाऱ्या आरोपींचा माग काढत पाच स्वतंत्र पोलिस पथकांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली.या प्रकरणी रवी संजय माने (वंजारवाडी), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी), अभिषेक भाऊसो ठोंबरे(ढेकळवाडी) आणि अतुल मोहन भोलणकर(वंजारवाडी) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.तासगाव (जि. सांगली) येथील व्यापारी सूरज सर्जेराव गावडे (वय २७) हे फेसबुक मार्केटप्लेसवरील "बाजारभावापेक्षा स्वस्त गहू" या जाहिरातीला भुलले. लिंकवर माहिती भरल्यानंतर त्यांच्याशी फेसबुक ऑडिओ कॉलद्वारे संपर्क साधून बारामती येथे बोलावण्यात आले. ४ मे रोजी गावडे हे रोख रक्कम घेऊन टेम्पोसह बारामतीत दाखल झाले.फोनवरील सूचनांनुसार त्यांना पेन्सिल चौक व नंतर कल्याणी कॉर्नर येथे नेण्यात आले. तेथून एका संशयिताने "शेठने पाठवले आहे” असे सांगत त्यांना निर्जन ठिकाणी नेले. पेंजिओ कंपनीमागील पुलाजवळील प्लॉटमध्ये आधीच इतर आरोपी वेरना कारमध्ये थांबले होते.तेथे पोहोचताच आरोपींनी गावडे व त्यांच्या चालकावर पिस्तूल रोखत शिवीगाळ व मारहाण केली. गावडे यांच्या खिशातील २५,५०० रुपये,चांदीच्या अंगठ्या, घड्याळ तसेच चालकाच्या कानातील सोन्याची बाळी जबरदस्तीने काढून घेत सुमारे ५१,५०० रुपयांचा ऐवज लुटला. “पोलिसात तक्रार केली तर जिवे मारू" अशी धमकी देत आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक
चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ
तपास सुरू करण्यात आला. सायबर तपास,
सीसीटीव्ही आणि फिर्यादीच्या ओळखीवरून
आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपी उंडवडी परिसरातून पाटसकडे गेल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान, त्यांनी शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी,खडकी, रावणगाव, कुरकुंभ, भिगवण, निरगुडे,लाकडी, कळस, डाळज, भाडलवाडी अशा ठिकाणी मार्ग बदलत पळ काढण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी इंदापूर, भिगवण व वालचंदनगर येथे नाकाबंदी करत पाठलाग तीव्र केला.अखेर सिन्नरमास कंपनी परिसरात समोरून व मागून घेराव घालत रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.या कारवाईत आरोपींकडून ७.५० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, दोन पिस्तूल व जिवंत काडतुसे, तसेच ६५ हजार रुपये रोख असा एकूण ८.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार,पोलीस सब इन्स्पेक्टर धनश्री भगत हवालदार भारत खारतोडे, नितीन ढवण, जितेंद्र शशिकांत दळवी, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, संतोष कांबळे, आफ्रिन शेख, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे, हवालदार गणेश काटकर, किसान बेलदार,अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवन पोलीस
ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर अमित पाटील,
हवालदार महेश उगले, अपर पोलीस अधीक्षक
कार्यालयातील सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर गोरख पवार आदींचा कारवाई सहभाग होता. बारामती,वालचंदनगर व भिगवण पोलिसांसह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत ही यशस्वी मोहीम राबवली.ह्या धडाकेबाज कामगिरी बद्दल कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment