बारामती सत्र न्यायालयात आरोपींची निर्दोष मुक्तता..
बारामती : सत्र प्रकरण क्र. 60/2017 मध्ये माननीय सत्र न्यायालय, बारामती यांनी आरोपी चंद्रकांत भोसले व अरुणा फसगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणात अभियोजन पक्षाने भारतीय दंड संहिता कलम 375 व 376(2)(l) अंतर्गत गंभीर आरोप लावले होते. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण 11 साक्षीदार तपासले होते. तसेच पीडित ही मतिमंद असल्याने तिच्या साक्षीला न्यायालयाने महत्त्व दिले होते.
मात्र, सुनावणीदरम्यान असे आढळून आले की, 11 साक्षीदारांच्या जबाबांमध्ये तसेच तपास अधिकाऱ्यांच्या तपासात गंभीर त्रुटी होत्या. या त्रुटी सुसंगत व प्रभावी स्वरूपात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेशा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
तसेच, DNA अहवाल सकारात्मक (positive) असला तरी तो केवळ शारीरिक संपर्क दर्शवतो. त्यावरून आरोपी क्रमांक 1 यांनी पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, हे निष्कर्ष काढणे योग्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
बचाव पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या युक्तिवादात खालील महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्यात आल्या:
- साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती
- तपासातील त्रुटी
- वैद्यकीय व तज्ज्ञ पुराव्याचा अभाव
- DNA अहवालाची मर्यादा
वरील सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.
सदर प्रकरणात बचाव पक्षाचे कामकाज ॲड. बापूसाहेब शिलवंत यांनी प्रभावीपणे पार पाडले. त्यांना ॲड. रवी अवघडे, ॲड. राहुल गिरमे, ॲड. सागर खरात,अॕड.स्वप्निल खरात तसेच लीगल एडचे मॉनिटर ॲड. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment