सत्यमेव जयते फार्मर कप' शुभारंभ; कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 29, 2026

सत्यमेव जयते फार्मर कप' शुभारंभ; कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था..

'सत्यमेव जयते फार्मर कप' शुभारंभ; कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था..
बारामती(रामायण धर्माधिकारी):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथून राज्यस्तरीय 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' चा  शुभारंभ करण्यात आला; या कार्यक्रमाचा  तालुक्यातील शेतकरी गट व शेतकऱ्यांना लाभ घेता येण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली, याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आदी मान्यवरांनी शाश्वत शेती, जलसंधारण आणि सामुदायिक सहभाग या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा लाभ उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला.  

यावेळी प्र. उपविभागीय  कृषी अधिकारी रेश्मा जोशी, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले. मेंटार विजय गोफणे आणी रणजीत धुमाळ यांनी पाणी फाऊंडेशन गटाच्या कामाबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमास शिरसाई शेतकरी सहजजीवन समूह, सावंतवाडी व सत्या शेतकरी सहजजीवन समूहाचे सदस्य शेतकरी, जानाई माता शेतकरी गट आणी न्यू लांटो शेतकरी गट पानसरेवाडी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment