कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव; अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 1, 2026

कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव; अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान..


कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव; अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान..
बारामती:- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद संपतराव जगताप यांच्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवे बदद्ल बारामती बाजार समिती आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवार दि. ३० जुन २०२६ रोजी मुख्य बाजार आवारातील नवीन रेशीम मार्केट इमारत येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व अजितदादांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक सुनील पवार यांनी केले तर सूर्यकांत मोरे यांनी सचिव पदी केलेल्या सेवाकाळाचा आढावा घेऊन यांच्या प्रामाणिक, तत्परता, पारदर्शक कामाचे कौतुक करून शिस्तबद्ध प्रशासनाची माहिती दिली. श्री. शरद भोसले यांनी सचिव अरविंद जगताप यांच्या कार्याचा प्रेरणादायी लघुचित्रफीत सादर केली, यावेळी बाजार समितीच्या विकासासाठी उपबाजार आवार व पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध करून देणे, सीएनजी पंप उभारणी, बारामती, जळोची , सुपे व झारगडवाडी येथे नवीन जागा संपादन, बाजार समितीचा विस्तार, आधुनिक सुविधा उभारणी, ग्रेडींग मशिन, मॅग्नेट प्रकल्प, जळोची येथे नवीन ऑफीस इमारत, रयतभवन येथे शेतकरी मॉल उभारणी, व्यापारी व कर्मशिअल गाळे बांधून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे आदी विकासकामांत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.  स्व. अजितदादा पवार साहेब व आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पवार कुटुंबीयांच्या सहकार्याने अरविंद जगताप यांनी बाजार समितीला नवे वैभव प्राप्त करून दिले. आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची देशातील आदर्श बाजार समिती म्हणून झालेली ओळख ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात संभाजीनाना होळकर यांनी अरविंद जगताप यांच्या कार्याचा गौरव करताना, विविध विकासकामांसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. पवार कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ, शाल देऊन अरविंद जगताप यांचा सत्कार करण्यात आला. उपसभापती अरुण सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, फळे-भाजीपाला आडतदार संघटनेचे अध्यक्ष सईद बागवान, बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, उपसभापती अरुण सकट, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, नगरसेवक सुरेश सातव यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती रमेश गोफणे, विठ्ठलराव देवकाते, संजय काटे, ज्ञानदेव कदम अनिल हिवरकर, धनवान वदक, गोरख चौलंग, अशोकराव मुळीक आणि उपसभापती लक्ष्मणराव मोरे, कुंदन देवकाते, अशोकराव खैरे, सौ. छाया जमदाडे, सौ. अलका जगताप, सौ. उषाताई भोंडवे, संध्याताई बोबडे तसेच सुर्यकांत गादिया, शरद भिंगे, बाळासाहेब फराटे, अमोल वाडीकर, शंकर सरक, दादासो मोरे  आणि आजी-माजी पदाधिकारी, संचालक, शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी आणि बाजार समितीचे सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment