आरोग्य निरीक्षक प्रवीण प्रभाकर गायकवाड यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2026

आरोग्य निरीक्षक प्रवीण प्रभाकर गायकवाड यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा...

आरोग्य निरीक्षक प्रवीण प्रभाकर गायकवाड
यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा...
 बारामती :-बारामती येथील जिल्हा परिषद पुणे प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवाडी ता. बारामती आरोग्य विभागातील कर्तव्यदक्ष, समर्पण आणि
सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास करणारे
आरोग्य निरीक्षक (HA) श्री. प्रवीण प्रभाकर
गायकवाड, जिल्हा परिषद काटेवाडी यांचा २०
वर्षे १ महिना १५ दिवसांच्या प्रदीर्घ सेवेनंतर
सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा थाटात पार
पडला.या कार्यक्रमास त्यांचे कुटुंबीय, आरोग्य
विभागातील सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ, मातोश्री, नातेवाईक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सेवाकाळात
त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा
अविरतपणे बजावली. त्यांच्या या कार्याबद्दल
त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन
भावनिक निरोप देण्यात आला. यावेळी
बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष
अनिल गायकवाड, दौंड मधील सामाजिक
ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र जाधव, कैलास गायकवाड, लिंगाळे गावचे माजी सरपंच दिलीप जाधव, तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर आरोग्य अधिकारी डॉ.बागवान,वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नितीन जाधव, विद्या जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, डॉ. तनुश्री नितीन जाधव,
पंचायत समिती बारामती, डॉ जीवन सरतापे, डॉ. जनार्धन सोरटे,तसेच काटेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.वैशाली देवकाते तसेच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी वर्ग, आशा वर्कर
मित्रमंडळी व समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment