सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभाग पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभाग पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभाग पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना.
बारामती :- बारामती उपविभागातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पडावा तसेच गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बारामती उपविभागीय पोलीस
प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
> सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठका :- सर्व पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये शासन व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन,
मिरवणुकीतील शिस्त, ध्वनिक्षेपकाचा विहित नियमांनुसार वापर, वाहतूक व्यवस्था, महिला व
बालकांची सुरक्षितता तसेच सामाजिक सलोखा राखण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
> तडीपार :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ (१) (ब) प्रमाणे बारामती उपविभागातील बारामती शहर
पोलीस ठाणे हद्दीतील अक्षय शांताराम देवकाते रा. महालक्ष्मी शोरुमचे पाठमागे बारामती यांस संपुर्ण
पुणे जिल्हयातुन ०३ महिने कालावधीसाठी हपार करणे आले आहे. तसेच इंदापुर पोलीस ठाणे हद्दीतील
शंकर ऊर्फ नाना भिमराव भोंग रा. निमगांव केतकी ता. इंदापुर पुणे यांस पुणे जिल्हयातील इंदापुर, दौंड,
बारामती तालुक्यातुन ०३ महिने कालावधी करीता हद्दपार करण्यात आले आहे.
> प्रतिबंधात्मक कारवाई. : - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागातील सर्व पोलीस ठाणे
•कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणाऱ्या घटना टाळता याव्यात तसेच समाजकंटक व अभिलेखावरील गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, यासाठी अभिलेखावरील गुन्हेगार, समाजकंटक, सराईत गुन्हेगार तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करण्याची शक्यता
असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
BNSS कलम १२६ अन्वये ४५० इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे अंतिम बाँड घेण्यात आले आहेत.
BNSS कलम १२९ अन्वये २६ इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले आहेत.
• गणेशोत्सव कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक तसेच मद्याच्या सेवनामुळे सार्वजनिक शांतता व
सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ - ब अन्वये
३६ इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
• तसेच, BNSS कलम १६३ अन्वये ५७ इसमांविरुद्ध मनाई आदेश काढण्यात आले आहेत.
> पोलीस बंदोबस्त :- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळे, मिरवणूक मार्ग
व गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी
अंमलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या
व्यक्तींवर परिस्थितीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव शांतता, शिस्त, बंधुभाव व सामाजिक सलोखा राखून साजरा करावा तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बारामती उपविभागीय पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.सदर उपाययोजना मा. श्री. संदीपसिंह गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व मा. श्री. गणेश बिरादार, अपर
पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment