धनगर आरक्षणासाठी बारामतीतून पुन्हा एल्गार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 2, 2026

धनगर आरक्षणासाठी बारामतीतून पुन्हा एल्गार

धनगर आरक्षणासाठी बारामतीतून पुन्हा एल्गार

बारामती :-धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस. टी. प्रवर्ग ) आरक्षण प्रश्नावर राज्यातील सर्व संघटना,आंदोलकांना एकत्र करून हा लढा राज्यभर नेण्याचा एल्गार आज बारामतीत पुकारण्यात आला.
    गुरुवारी धनगर आरक्षण उपोषणकर्ते व पश्चिम महाराष्ट्रातील समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बारामतीतील अहिल्यादेवी भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
 यावेळी उपोषणकर्ते चंद्रकांत दादा वाघमोडे, गणेश केसकर, डॉ. ईश्वर यमगर, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील,ऍड. जी. बी. गावडे,अनिताताई खरात, सुनील देवकाते,डॉ सुजित वाघमोडे,डॉ.नवनाथ मलगुंडे,, काकासो बुरुगले, महादेव कोकरे, ऍड. सचिन सोलणकर, हर्षवर्धन देवकाते, सोनू बुरूंगले,शंकर शिंगाडे, भिवाजी मलगुंडे, विठ्ठल देवकाते,रामभाऊ सोलनकर गणेश बोरकर आदी कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी सर्वच वक्त्यांनी धनगर समाजाची घटनादत्त मागणी, त्यासाठीचे ऐतिहासिक पुरावे, आणि वेळोवेळी केलेली उपोषणे, मोर्चे, रास्ता रोको आणि विद्धमान सरकारने केलेली फसवणूक यावर अत्यंत कठोर टीका केली. विशेषतः 2014 साली बारामतीतील उपोषण आंदोलन स्थळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याची लेखी हमी दिलेली होती " त्यानंतर या सरकारने टीस, डॉ शिंदे समिती नेमून धनगर समाजाची फसवणूक केली.
   आज धनगर समाज एस. टी. प्रवर्गाच्या मागणीसाठी राज्यभर वेगवेगळ्या व्यासपीठावरून आंदोलन करीत आहे. विखूरलेल्या आंदोलनामुळे राज्यसरकार समाजाची रास्त मागणी असूनही मुक्या बहिऱ्याची भूमिका घेत आहे. त्यांतून समाजाचेच मनुष्यबल वाया जात आहे. यासाठी राज्यभरातील धनगर समाजाच्या सर्व संघटना, प्रमुख कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांना एकत्र करून हा लढा अधिक तीव्र करण्याचा एल्गार यावेळी पुकारण्यात आला.
 यासाठी लवकरच धनगर आरक्षण अभ्यासकांची समिती राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment