स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ६ ग्रॅम ८५० मिली वजनाचे ५४८०० रु किंमतीचे मेफेड्रोन जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 16, 2020

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ६ ग्रॅम ८५० मिली वजनाचे ५४८०० रु किंमतीचे मेफेड्रोन जप्त

*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ६ ग्रॅम ८५० मिली वजनाचे ५४८०० रु किंमतीचे मेफेड्रोन जप्त*..        
लोणी काळभोर (प्रतिनिधी):-पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पाहिजे असलेला फरार आरोपीचा शोध घेणे कामी लोणी काळभोर पोलिस स्टेशन परिसरात (ता.१६) रोजी पेट्रोलिंग करीत असताना  गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून लोणीकाळभोर टोल नाका परिसरात एक इसम मैफड्रोन( DRUGS) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाले वरून सदर टोल नाक्यावर सापळा रचून एक इसमास ताब्यात घेतले सदरच्या इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक किट्टू पुजारी वय 47 वर्षे  सध्या रा.गंगाधाम कासा ग्रीन सोसायटी ५ वा मजला फ्लॅट क्र 505 कात्रज पुणे मूळ रा.किट्टू पुजारी पंडित बिल्डिंग पहिला मजला फ्लॅट नं १३ राजरामोहन रॉय कामा बाग समोर गिरगाव मुंबई पिन ४००००४ असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूच्या पुढील खिश्यात प्लास्टिकच्या पुडीमध्ये मेफेड्रोन (DRUGS) नावाचा अंमली पदार्थ मिळून आला मुद्देमालाचे वर्णन पुढील प्रमाणे (१)५४८०० : ६ ग्रॅम ८५० मिली वजनाचे मेफेड्रोन(drugs) अंतरराष्ट्रीय बाजार किंमत रु ₹८००० प्रती ग्रॅम प्रमाणे,(२)प्लास्टिकच्या लहान पुड्या असा एकूण ५४८०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लोनिकळभोर गुन्हा र नं ८७१/२०२० गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क)२२(अ) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी लोनिकळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,पोलिस उप नि शिवाजी ननावरे,पो हवा राजेंद्र पुणेकर,पो ना विजय कांचन,पो कॉ धिरज जाधव,पो कॉ अक्षय नवले यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment