वसंतनगर येथील टी सी कॉलेज रोड ची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

वसंतनगर येथील टी सी कॉलेज रोड ची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलन..

वसंतनगर येथील टी सी कॉलेज रोड ची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलन..              बारामती:-शहरातील वसंतनगर येथे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तसेच वसंतनगर, मिशन हायस्कूलसमोर अर्धवट अवस्थेत असलेल्या थोकादायक गतिरोधकामुळे दुर्घटना होत असून या रस्त्याची तातडीने दुरुस्तीची मागणी येथील रहिवाशांनी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.काही दिवसांपूर्वी मिशन हायस्कूलच्या ड्रेनेज पाइपलाइनसाठी रस्ता खोदण्यात आला होता. तो वेळीच दुरूस्त न झाल्याने वसंतनगरच्या एकाच बाजूने सर्ववाहने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वेळोवेळी अपघात होतात.वसंतनगर बाजूचा अर्धा गतिरोधक संपूर्णपणे ढासळलेला आहे. या परिसरामध्ये महाविद्यालय व शाळा असून तरुण मुले अत्यंत बेफाम वेगाने गाड्या चालवितात.तसेचगावात जाणारे वाहनचालक त्यांच्या बाजूने बरोबर जातात, परंतु महाविद्यालयाकडे(प्रगतीनगर,मोरयानगर,देवतानगर) जाणारे वाहनचालक हे गतिरोधकावरून न जाता अर्थवट ढासळलेल्या गतिरोधकावरून चुकीच्या बाजूने जातात. त्यामुळे बन्याच वेळा त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत. वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी करूनही अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. येथील गतिरोधक दुरुस्त करावा अथवा अर्धवट स्थितीत असलेला गतिरोधक काढून टाकावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. दुरुस्ती तातडीने करावी अन्यथा आंदोलनाचा
इशारा स्थानिकांनी दिला आहे.वसंतनगर मधील जेष्ठ समाजसेवक अनिल (कुंडलिकराव) गायकवाड, अशोक बापू गायकवाड, पत्रकार संतोष जाधव व अन्य रहिवाशांनी याबाबत मुख्याधिकार्यांना व नगराध्यक्षा,बारामती शहर पोलीस स्टेशन,आर टी ओ कार्यालय यांना पत्र दिले आहे.

No comments:

Post a Comment