चिंताजनक बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

चिंताजनक बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे.

चिंताजनक बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे.      बारामती दि.28:- कालचे शासकीय (27/11/20) एकूण rt-pcr नमुने 288.    एकूण पॉझिटिव्ह-18 . प्रतीक्षेत 16.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -32 त्यापैकी पॉझिटिव्ह -18.कालचे एकूण एंटीजन 143 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-25 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   18+18+25=61.   शहर-28 . ग्रामीण- 33.  एकूण रूग्णसंख्या-4898  एकूण बरे झालेले रुग्ण- 4441 एकूण मृत्यू-- 127. बारामती शहरातील शासकीय आरटीपीसीआर
तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, खंडोबाची वाडी येथील 35 वर्षीय महिला, लाटे येथील 25 वर्षीय पुरुष, सोनवडी सुपे येथील 40 वर्षीय पुरुष, रुई येथील 36 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, लोणीभापकर येथील 48 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 62 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 40 वर्षीय पुरुष,अंबिकानगर येथील 65 वर्षीय महिला, अवचट इस्टेट येथील 78 वर्षीय महिला, बारामती अँग्रो येथील 45 वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील 28 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 33 वर्षीय महिला,डोर्लेवाडी येथील 71 वर्षीय पुरुष, कोहाळे बुद्रुक येथील 43 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत
बारामतीत काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन कोरोनाग्रस्तांमध्ये तपासणीत आढळलेल्या करावागज येथील 40 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 16 वर्षीय मुलगा, 23 वर्षीय महिला, लाटे येथील 85 वर्षीय पुरुष, पणदरे येथील तीस वर्षीय पुरुष,बारामती शहरातील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. पिंपळी येथील 40 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, रुई येथील 29 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 42 वर्षीय महिला, रूई येथील 24 वर्षीय पुरुष,काटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगी, बारामती शहरातील 40 वर्षीय महिला, सुयशनगर येथील 20 वर्षीय महिला,18 वर्षीय युवक, 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे. बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत
आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुजावरवाडा माळेगाव रोड गुणवडी चौक येथील चाळीस वर्षीय पुरुष, मेडद येथील 18 वर्षीय युवक, का-्हाटी येथील तीस वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, मेडद येथील 18 वर्षीय युवक, काहाटी येथील तीस वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 61 वर्षीय महिला,कान्हाटी येथील 62 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये यादगार सिटी येथील 44 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील 68 वर्षीय पुरुष,सराफ होंडा शोरूम पाठीमागे ग्रंथ अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश असून यामध्ये 13 वर्षीय मुलगा, 59 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, संघवी टाऊनशिप येथील 38 वर्षीय पुरुष, को्हाळे बुद्रुक येथील सहा महिन्याची मुलगा, 36 वर्षीय महिला, सोमेश्वर नगर येथील 47 वर्षीय महिला, माळेगाव कॉलनी समोरील 59 वर्षीय महिला, लोहार वस्ती पवारवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, उंडवडी सुपे येथील पाच वर्षीय मुलगा, 27 वर्षीय महिला, 52 वर्षीय महिला, शारदानगर येथील 47 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 55 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत चालला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment