सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 8, 2020

सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न


सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न 

बारामती दि. 8 :- बारामती तालुक्यातील 2020 - 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य मोरोपंत नाट्यगृह, बारामती येथे संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार पी.डी.शिंदे, तहसिल कार्यालयातील कर्मचारी , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वप्रथम तहसिलदार पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून आसन ग्रहण करावे अशी सूचना केली . यानंतर पाटील म्हणाले की, बारामती तालुक्यात एकूण 99 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये अनूसूचित जातीसाठी 15 पदे, अनूसुचित जमातीसाठी 1 पद, नागरिकांच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील 27 पदे, आणि सर्वसाधरण मध्ये 56 पदांची सोडत जाहिर करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के प्रमाणे अनुसूचित जातीची 8 , अनुसूचित जमातीचे 1, नागरिकांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारणसाठी 28 पदांची सोडत करून आरक्षण जाहिर करण्यात येणार आहे. 
या सोडतीची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती :- भिलारवाडी, कन्हेरी, काटेवाडी, निरावागज, कोऱ्हाळे खुर्द , गुणवडी, कोळोली, गोजूबावी .अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षित ग्रामपंचयती:- मुडाळे, करंजे, मळद ,कटफळ, पणदरे, निंबोडी, शिरवली .
अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायत :- निंबूत 
नागरिकांचा इतर मागासप्रवर्गातील स्त्रीयांसाठी आरक्षित ग्रामपंचायती :- वाकी, खराडेवाडी, , काऱ्हाटी, पिंपळी, कुतवळवाडी, लोणीभापकर, साबळेवाडी, गडदरवाडी, सावळ, डोर्लेवाडी, मुर्टी , पारवडी, ढेकळवाडी, कारखेल .
नागरिकांचा इतर मागासप्रवर्गातील आरक्षित ग्रामपंचायती :- सस्तेवाडी , मुरूम, बाबुर्डी, वंजारवाडी, नारोळी, धुमाळवाडी, जैनकवाडी, वडगाव निंबाळकर, होळ, कऱ्हावागज, कांबळेश्वर, सोरटेवाडी, थोपटेवाडी.
सरपंच पद सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग ग्रामपंचायतीची नावे :- उडवंडी सुपे , जळगाव सुपे,  काळखैरेवाडी, सोनगाव, माळवाडी लाटे, पवईमाळ, आंबी बुद्रुक, अंजनगाव, शिर्सुफळ, खांडज, चोपडज,  उंडवडी क.प, देऊळगाव रसाळ, करंजेपूल, वाणेवाडी, सोनकसवाडी, कुरणेवाडी, मोरगाव, भोंडवेवाडी, मोराळवाडी, सदोबाचीवाडी, आंबी खुर्द, पळशीवाडी, मगरवाडी, माळवाडी लोणी, पाणसरेवाडी, गाडीखेल, माळेगाव बु. खुला सर्वसाधारण ग्रामपंचायती नावे :- कोऱ्हाळे बु. , जोगवडी , लाटे, सोनवडी सुपे, मेडद, मेखळी,
जळगाव क.प, सुपा, वाघळवाडी, माळेगाव खुर्द,  पाहुणेवाडी, बऱ्हाणपूर , झारगडवाडी, सांगवी, मानप्पावस्ती, शिरष्णे, ढाकाळे, चांदगुडेवाडी, सायबांचीवाडी, मासाळवाडी, तरडोली, वढाणे, चौधरवाडी, मोडवे, खंडोबाचीवाडी, घाडगेवाडी, दंडवाडी, जराडवाडी. 

No comments:

Post a Comment