भाजपा चे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश(तात्या) भेगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा... बारामती(संतोष जाधव):-भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश (तात्या) भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरेंद्र शामसुंदर जेवरे व पोपटराव गणपत खैरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि. ०२/०२/२०२१ रोजी केले होते. त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. जालिंदर भाऊ कामठे यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आप्पा खैरे यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला. त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. शिवाजीराव भुजबळ व अॅड. नितीनजी भामे ,विरोधी नगरसेवक श्री.सुनिलजी सस्ते प्रमुख उपस्थीत होते. त्याप्रसंगी नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला .तसेच आगामी नगरपालिका ,पंचायत समिती,जिल्हा परिषद, निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना अहवान केले. त्यासाठी अवश्यक बुथ रचना कार्यन्वीत होण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच दि. ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी
दरम्यान होणा-या बुथ सशिक्तीकरण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. येणारे काळात आघाड़ी सरकारच्या विरूध्द जनतेच्या विविध प्रश्नांसाठी अंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते व
पदाधिका-यांची कोणाचीही भिडभाड न ठेवता.रस्त्यावर उतरण्याचे आव्हान केले.
तसेच त्यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य मा.शिवाजीराव भुजबळ यांनी ५ फेब्रुवारी
होणा-या वाढीव विज बिलाबाबत करण्यात येणा-या अंदोलना विषयी मार्गदर्शन केले व बुथ
कमेटी यांचा फेर आढावा घेतला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीतीत होते. सदर वाढदिवसाच्या कार्याक्रमाच्या निमीत्ताने सकाळी ११:०० वाजता स्वामी विवेकानंद उद्यान ,टी. सी. कॉलेज
शेजारी वृक्षा रोपन करण्यात आले.दुपारी १२:०० वाजता चर्च ऑफ खाईस्ट मिशन बोर्डींग येथे अनाथ मुलांना अन्न दान करण्यात आले.
दुपारी ०१:०० वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीत मा. सुरेंद्र जेवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. प्रविणजी आटोळे यांनी केले.सदर कार्यक्रमास
प्रमोद तावरे,अॅड.गिरीष देशपांडे अॅड. शामसुंदर पोटरे,गोरख,बारवकर,ओंकार वाघमोडे,बाळासो बालगुडे , प्रमोद डिंबळे , दिपक कळसकर, सचिन मोरे,महेंद्र जेवरे,रघु चौधर,नाना भापकर,सुधाकर पांढरे, अभिमन्यु गुळूमकर,अनिल जगताप,शरद भगत,अल्ताफ बागवान,दादासो कोकणे, गणेश सोलनकर,आकाश पाटील,अक्षय गायकवाड,सुरज खैरे,संजय दराडे,
संजय रायसोनी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment