सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुले डांबून ठेवल्याचा आरोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुले डांबून ठेवल्याचा आरोप..

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुले डांबून ठेवल्याचा आरोप..                                                                             मुंबई(प्रतिनिधी):-महाविकास आघाडी चे सरकार आल्यापासून ह्या सरकार मधील मंत्री महोदय यांच्या मागे काहीना काही विषयामुळे वादग्रस्त ठरत आहे, आत्ता पुन्हा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज वक्ते धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण मिटत नाही तोच पुन्हा एकदा त्यांच्यावर करुणा यांनी आपली 2 मुले धनंजय मुंडे यांनी बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.याबाबत करुणा यांनी मुंबई पोलीस आयुक्त
यांच्याकडे तशी तक्रार केल्याची माहिती एका
आघाडीच्या वृत्तपत्राने आपल्या पोर्टलमध्ये प्रसिद्ध केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी करुणा यांच्या दोन मुलांना ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलीचा समावेश असून चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तसेच आपली मुले सुरक्षीत नसून त्यांना धोका
असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे.
आपली मुले आपल्याला मिळाली नाहीत तर
आपण येत्या 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
करुणा यांना आपली व्यथा फेसबुकवर टाकून धनंजय मुंडे यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख केला करून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मुलांना त्यांच्या बंगल्यात लपून ठेवले असून वाढदिवसाच्या दिवशीही आपल्याला भेटू दिले जात नसल्याचा आरोप केला असल्याचे कळतेय.

No comments:

Post a Comment