अंतर्गत आरोग्याच्या प्रश्नावर स्त्रिया उदासीन; नियमित आरोग्य तपासण्या आवश्यक - डॉ. दीपा देवळेकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

अंतर्गत आरोग्याच्या प्रश्नावर स्त्रिया उदासीन; नियमित आरोग्य तपासण्या आवश्यक - डॉ. दीपा देवळेकर

अंतर्गत आरोग्याच्या प्रश्नावर स्त्रिया उदासीन; नियमित आरोग्य तपासण्या आवश्यक - डॉ. दीपा देवळेकर

पुणे:-ताडीवाला रस्ता, दि. १९:- झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकरी - श्रमिक महिलांमध्ये आरोग्य प्रश्नावर कमालीची उदासीनता दिसून येते. दिवसभर संसारिक आणि चरितार्थ चालविण्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासापुढे स्वतःच्या शारीरिक वेदनांची तीव्रता स्त्रियांना जाणवत नसावी मात्र येथील आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. अंतर्गत आरोग्य, पाळीचे प्रश्न, पोटाचे आणि पचनाचे विकार, त्वचेचे विकार इत्यादी मोठ्या प्रमाणावर दिसून आले. मात्र हे चित्र बदलण्यासाठी सातत्यपूर्वक येथील महिला वर्गाची आणि बाल आरोग्यची काळजी घेण्यासाठी नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीपा देवळेकर यांनी व्यक्त केले.
       रुग्ण हक्क परिषद पुणे शहराच्या वतीने महिला व असंघटित कामगार आरोग्य सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत असंघटित महिला कामगारांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त ताडीवाला रस्ता येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ. दीपा देवळेकर बोलत होत्या. यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यालयीन संपर्कप्रमुख दिव्या कोंतम, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे, संयोजक अनुप्रिता दीक्षित उपस्थित होत्या.
      यावेळी शंभरहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अनेक वेगवेगळे आजार आणि त्यांची लक्षणे असणारे गुंतागुंतीचे आजार यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले. नीटनेटके राहणीमान आणि स्वतःचे दिसण्याकडेही दुर्लक्ष असणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या अंतर्गत आरोग्याकडे आणी बाह्य आरोग्याकडे दुर्लक्ष करतात गरीबी संसारीक अडचणी आणि आर्थिक निकड यातून सावरताना त्यांचे स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे त्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी प्रचंड हानिकारक आहे.
      यावेळी डॉ. दीपा देवळेकर यांचेसह होप हॉस्पिटल मधील  सहकाऱ्यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment