काटेवाडी येथे उसाचे शेतात महीलेचा प्रेताचा सांगाडा,मयताच्या वस्तू ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी केले आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

काटेवाडी येथे उसाचे शेतात महीलेचा प्रेताचा सांगाडा,मयताच्या वस्तू ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी केले आवाहन..

काटेवाडी येथे उसाचे शेतात  महीलेचा प्रेताचा सांगाडा,मयताच्या वस्तू ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी केले आवाहन..                                                                                                    बारामती:- बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील इसम नामे सिद्धार्थ ठोंबरे राहणार काटेवाडी यांचे शेतजमीन गट नं ४२५ मधिल उसाचे शेतात एक महीला जातीचा प्रेताचा सांगाडा मिळून आला असून त्यावरील संपुर्ण मांस झडुन गेलेले व प्रेताची कवटी, मनक्याचे, हाता पायांचे हाडाचे सुट्टेभाग मिळून आले आहेत.त्यावरून बारामती तालुका पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नं. १२/२०२१ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.सदर मयत स्त्री ( हाडांचा सांगाडा ) सोबत साडी, ब्लाउज तसेच खालील वस्तू मिळून आल्या आहेत सदरच्या वस्तू कोणी ओळखत असेल किंवा कोणाच्या नातेवाईकांच्या असतील त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे खालील नंबरवर संपर्क करावा ही विनंती.मयता सोबत मिळून आलेल्या वस्तु व त्यांचा फोटो  व माहिती १) दोन शिंपले असलेले पिवळया धातुचे एक मणी मंगळसुत्र त्यामध्ये काळे व पिवळे धातुचे मणी असलेले,२) काचेच्या हिरव्या बांगडया,३) एक हातरूमाल त्यावर डोरेमॉन व एका मुलीचे कार्टुनचे चित्र असलेला रूमालामध्ये २००/-रू दराची एक,१००/-रू दराची एक, ५०/- रू दराची एक व २०/- रू दराची एक नोट असे एकुण ३७०/-रू बांधलेले ओलसर फाटलेले स्वरूपात.
४) पांढऱ्या रंगाची पॅरागॉन कंपनीची लेडीज स्लिपर ५) एक हिरव्या रंगाची कापडी पिशवी.६) केसांमध्ये घालण्याचा रबर त्यास गोलाकार लटकण असलेले.७) सहा लोखंडी तारखिळे ते एकत्र दोऱ्यामध्ये बांधलेले.
८) चाकलेटी रंगाची साडी साडीवर लाल रंगाचे ठीपके हीरवे, पिवळे रंगाचे पट्टे असलेली साडी साडीस एका बाजुस फुला पानांची नक्षी असलेली एक इंच जाडीची निळसर लेस लावलेली.
९) चाकलेटी रंगाचा ब्लाउज त्याचे दोन्ही बाहयांवर साडीसारखीच एक इंच लांबीची फुला पानांची नक्षी असलेली निळसर लेस लावलेली.
संपर्क नंबर :-१) महेश ढवाण, पोलीस निरीक्षक/ बारामती तालुका पोलीस स्टेशन.मो नं ९०११२८०७७७ , २) प्रमोद पोरे/ सहा. पोलीस निरीक्षक/बारामती तालुका पोलीस स्टेशन.मो.नं. ७७१९९८६८६८ , ३) बारामती तालुका पोलीस स्टेशन ०२११२-२४३४३३    ८८८८४३०१८४
या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment