करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी ...

करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी ...                                                         मुंबई (प्रतिनिधी): करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मास्क वापरा, गर्दी टाळा. सार्वजनिक कार्यक्रम,
सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन
करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात करोना रुग्णांचे वाढते प्रमाण
लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य
प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे करोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही.लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. राज्यात सार्वजनिक ठिकाणी करोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे
पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे.ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटेनमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोना उपचारासाठी जी क्षेत्रिय रुग्णालये करण्यात आली आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे, असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment