कानाने ऐकू येत नाही म्हणून कंटाळून डॉक्टराची कुटुंबासह आत्महत्या - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

कानाने ऐकू येत नाही म्हणून कंटाळून डॉक्टराची कुटुंबासह आत्महत्या

 कानाने ऐकू येत नाही म्हणून कंटाळून डॉक्टराची कुटुंबासह आत्महत्या
                                                          कर्जत(प्रतिनिधी):- कर्जत तालुक्यातील राशीन येथील 16 वर्षीय कर्णबधीर मुलाचे समाजात
अपराधीपणाने वावरणे आता मला सहन होत
नाही, अशी सुसाईड नोट लिहून कर्जत येथील
एका प्रसिध्द डॉक्टरने पत्नी, आणि दोन
मुलांना विषारी इंजेक्शन देऊन स्वतः देखील
आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने
हलदळ व्यक्त होत आहे.कर्जत तालुक्यातील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. थोरात यांचे राशीनमध्ये हॉस्पिटल आहे. आज त्यांचे कुटुंबीय घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ.महेंद्र वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय
16) व लहान मुलगा कैवल्य (वय 7) हे
मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना
विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी
गळफास लावून घेतल्याचे दिसून येत
असल्याचे पोलिसांनी सांगितले.थोरात यांच्या घरात पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. चिट्ठीत म्हटले आहे की, आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत
आहोत. कृष्णाला कानाने ऐकू येत नाही.
त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने
राहणे आता सहन होत नाही. अनेक
दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत.
कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र,
तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे
दुःख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे
सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे.
याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर
धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला
योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला
माफ करा, असेही चिट्ठीत म्हटले आहे. कृष्णा
हा क्रिकेट खेळाडू होता. त्याला पुण्यातील
एका क्रीडा संस्थेत शिक्षणासाठी पाठविले
होते. त्याला ऐकू यावे, यासाठी बरेच उपचार
केले. मात्र, त्यात यश येत नव्हते. त्याला
श्रवणयंत्रही घेऊन देण्यात आले होते.
त्याचाही उपयोग होत नव्हता.  उपयोग होत नव्हता. डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. ते चांगले चालत होते.त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे स्नेहबंध वाढले होते. मात्र, आज अचानक त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment