94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात घुमणार बारामतीचा आवाज : प्रा.विजय काकडे यांच्या कवितेची निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात घुमणार बारामतीचा आवाज : प्रा.विजय काकडे यांच्या कवितेची निवड

*94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात घुमणार बारामतीचा आवाज : प्रा.विजय काकडे यांच्या कवितेची निवड* 

बारामती:-बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. विजय काकडे यांच्या " गावाकडची शाळा " या कवितेची नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्य अखिल भारतीय साहित्य संमेलनात सादरीकरणासाठी निवड झाली आहे. दिनांक १२ मार्च रोजी नाशिक येथील कार्यालयातून दूरध्वनीवरुन त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. 

सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत हे संमेलन स्थगित करण्यात आले आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर  हे संमेलन घेण्यात येणार आहे. 

प्रा. काकडे सातत्याने साहित्य क्षेत्रात कार्यरत असतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या कथा व कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे उत्तम कार्य केले आहे. याकाळात त्यांनी सुमारे ५० कथा, २०० कविता व ५०० पेक्षा जास्त चारोळी लेखन केले आहे. 
शिरोमणी काव्य, चंचू काव्य, अष्टाक्षरी, मधुसिंधु काव्य, गझल, वृत्तबद्ध कविता या व अशा अनेक प्रकारात प्रा. काकडे प्रभावी कविता लेखन करतात. त्यांचा " व्यथा व वेदना हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. या निवडीबद्दल बारामती परिसरातून प्रा. विजय काकडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment