बारामती नगरपरिषदेचा पाच टक्के राखीव निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याची मागणी.. बारामती:- शहरातील दिव्यांगांना ५% निधी
अंतर्गत सण 2019-२० मध्ये अनुदान वाटप करण्यात आले आहे त्यातूनही काही रक्कम शिल्लक राहिली असून ती इतर वर्ग न करता तसेच अख्चिक न ठेवता यापूर्वी देण्यात आलेल्या ज्या दिव्यांगांना ५% निधी मिळाला आहे तसेच नवीन दिव्यांग यांना देखील या निधीचा फायदा मिळावा तसेच समान रक्कमेची वाटप
व्हावी तसेच इतर काही योजना राबवाव्यात यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहर यांच्या वतीने आज या विषयांचे पत्र माननीय मुख्य अधिकारी बारामती नगर परिषद बारामती यांना समक्ष भेटून दिले असता त्यांनी देखील मी याचा अभ्यासपूर्वक अभ्यास करून तुमच्या सर्व दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.सदर निवेदन देताना बारामती शहर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष- मृत्युंजय सावंत व कैलास रमेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले,तसेच शहर अध्यक्ष- प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष- अजिज शेख, कार्याध्यक्ष- नामदेव चांदगुडे,
तालुका कार्याध्यक्ष- संजय अहिवळे,
तालुका उपाध्यक्ष- दीपक शिंदे,फरीद शेख, सुरज गायकवाड, संदीप नाळे, विनोद सोनवणे मधुकर वायकर हे सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment