बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी..अपघात घडलेलाचा बनाव करुन अपहार केलेला ४० लाख रुपये किंमतीची दारु मुदेमाल हस्तगत करत गुन्हयाचा केला पर्दाफाश... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 31, 2021

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी..अपघात घडलेलाचा बनाव करुन अपहार केलेला ४० लाख रुपये किंमतीची दारु मुदेमाल हस्तगत करत गुन्हयाचा केला पर्दाफाश...

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी..अपघात घडलेलाचा बनाव करुन अपहार केलेला ४० लाख रुपये किंमतीची दारु मुदेमाल हस्तगत करत गुन्हयाचा केला पर्दाफाश...
बारामती(संतोष जाधव):- तालुका पोलीस स्टेशन चे हददीत मधील मॅकडॉल कंपनी मधुन ता २८/१०/२०२१ रोजी रात्री ११/०० वाचे सुमारास युनाटेड स्प्रिंटकंपनी मधुन मॅकडॉल नं १ विस्कीचे दारुचे बॉक्स किंमत रुपये ६५ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा माल घेवुन ट्रक नं एम एच १२ एफसी ६१५० हिचे मध्ये भरुन जळगाव इथे निघाले असताना ट्रक उंडवडी कप या ठिकाणी दारु ने भरलेला उलटला असल्याबाबत पहाटे ०५/०० वाचे सुमारास पोलीस स्टेशन येथे फोन आल्याने सदर ठिकाणी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा ढवाण व त्याची गुन्हेशोध पथकाची टीम सदर घटना स्थळावर पोहचली व पाहणी करुन पोलीस स्टेशन येथे आले असता सदर अपघात घडले बाबत तकार देणे करीता   मालक अजिनाथ जराड ,अकुंश बेंद्रे रा बारामती ता बारामती हे पोहचले होते पोलीस निरीक्षक व त्याचे टीम ला सदर इसमाचे सांगणेवर संशय आल्याने त्याचे अधिक कशोसीने तपास केला असता ट्रक वरील चालक व मालकाने उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने गुन्हेशोध पथकाने सदर घटनेचा उलट तपास करुन ट्रक कंपनी मधुन निघाले पासुन रोडचे सीसीटीव्ही फुटेज चेक केली असता सदर ट्रक भवानी नगर चे दिशेने गेलेचे दिसला त्यावरुन अधिक तपास केले असता .सत्यघटना बाहेर
काढण्यात पथकाला यश आले चालकान व मालकाने यांनी स्वताचा अर्थिक फायदा होणे करीता त्याचा मित्र नंदकुमार क्षिरसागर रा गौतडी ता इंदापुर जि पुणे याचे मदतीने ट्रक मधील ५०० बॉक्स दारु किंमत ४० लाख रुपये ही एका गोडावुन मध्ये अपहार करुन काढुन ठेवुन स्वता उंडवडी येथुन जात असता अपघात झाला असे भासवणे करीता रस्त्याचे कडेला गाडी पलटी
करुन सदर दारुचा मुदेमाल गाडी पलटी झालेवर गावातील लोकांनी उचलुन नेला असला बाबत बनाव करुन फि्याद देणे बाबत देणे आले होते असे पोलीस निरीक्षक व तपास पथकाचे सखोल तपासने निषपन्न झाले असुन . अपहार केलेला ४० लाख रुपये किंमतीचा दारु चा मुदेमाल जप्त
करुन सदर गुन्हयात २ आरोपी अटक करण्यात आले आहेत पुढील तपास पोसई खरात हे करीत
आहेत.सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली पोसई खरात गुन्हे शोघ पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,चालक पो ना सदाशिव बंडगर पो कॉ अनिकेत शेळके यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment