सामाजिक ऐक्य बांधिलकी जपत भाजी विक्रेते फारूक(चाचा ) तांबोळी यांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणीतून मदत देण्यात आली....
बारामती:- आज रोजी दिनांक 24 /11 /2021 वार बुधवार* या दिवशी उपविभागीय अधिकारी बारामती .मा. गणेश इंगळे (DYSP) व तसेच बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. सुनिल महाडीक (Pl) यांच्या हस्ते कुटुंबीयांना रोख रक्कम स्वरुपात मदत देण्यात आली...
दि.13/11/2021 रोजी वार शनिवार भाजी विक्रेते फारुख(चाचा) इसाक तांबोळी यांचा लक्ष्मीनारायण नगर कसबा येथे एका विकृत गुंड हल्लेखोराने खुनी हल्ला केला. फारुक(चाचा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फारुख(चाचा) घरात एकमेव कमवती व्यक्ती होती. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मोठ्या मुली व एक सहा वर्षाचा लहान मुलगा आहे..
पित्रुछत्र हरवले, घरचा आधरवड गेला. चार मुले आनाथ झाली..तसेच या कुटुंबाला आजच्या घडीला उदरनिर्वाहचे कुठलेही साधन नाही..हे जाणून सामाजिक कार्यकर्ते व पोलिस प्रशासनाने आर्थिक मदतीचे आवाहन जनतेला केले. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी मदत म्हणून गुगल पे, फोन पे, आणि रोख स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे रक्कम जमा केली... सामाजिक भावनेतून मदत म्हणून आलेल्या लोकवर्गणीतून मिळालेली रक्कम *एक लाख ३९ हजार १०० रुपये /-* आज रोजी त्यांचे कुटुंबीय पत्नी व मुले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी उपस्थित मानवी हक्क सामाजिक कार्यकर्ते, मुनिर तांबोळी , चिऊशेठ जंजीरे, दादा धवडे , आरीफ तांबोळी सागर इंगले , अरबाज तांबोळी, अक्कुभाई बागवान, बबलु शेख, तसेच तांबोळी जमात बारामती चे जावेद तांबोळी, असलम तांबोळी, युसूफ तांबोळी, इम्रान तांबोळी, अफजल तांबोळी, बशीर तांबोळी, या सर्व पदाधिकारी यांच्यासह लक्ष्मीनारायण नगरचे रहीवाशी व इतर नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment