जिल्ह्यातील एक लाख दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे होणार मोफत वाटप...पूर्वतपासणी शिबिरे एक डिसेंबर पासून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत बैठक संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 22, 2021

जिल्ह्यातील एक लाख दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे होणार मोफत वाटप...पूर्वतपासणी शिबिरे एक डिसेंबर पासून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत बैठक संपन्न

*जिल्ह्यातील एक लाख दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे होणार मोफत वाटप...पूर्वतपासणी शिबिरे एक डिसेंबर पासून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत बैठक संपन्न*
पुणे, दि. २१ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील तब्बल एक लाख ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली, पुणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, यशवंतराव प्रतिष्ठाण, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग नागरिकांसाठी कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात ही पूर्वतपासनी शिबीरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांतून निवड झालेल्या तब्बल एक लाख नागरिकांना आवश्यक सहाय्यभूत साधने मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी सांगितले. 'राष्ट्रीय वयोश्री' आणि 'एडीप' योजने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून येत्या १ डिसेंबर पासून पुढील ८१ दिवस हा उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
यासंदर्भात आज जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीस अध्यक्ष पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, 'ऍलिमको'चे विपीन रावत, किरण पावरा, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे पदाधिकारी नंदकुमार फुले, अशोक सोळुंके, अमेय अग्रवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. यशवंतराव प्रतिष्ठाण, मुंबईचे संयोजक विजय कान्हेकर आणि अभिजित राऊत यांनी यावेळी योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या योजनेची संपूर्ण पुणे जिल्ह्यात अमंलबजावणी करण्यासाठी आणि प्रत्येक गावातील लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवून जास्तीत जास्त लाभार्थी निवडण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

No comments:

Post a Comment