बंधुराज नोंद घेतलेली आहे एवढेच सांगतो,अशा शब्दांत अजित पवारांकडून राजेंद्र पवार यांना 'कोपरखळी'.... बारामती:- येथे काल झालेल्या अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे मोठे बंधू राजेंद्र पवार यांचा कोपरखळ्यांचा चांगलाच खेळ रंगला. आमचे पवार यांच्या बंधू आज लय जोरात होते. एखाद्याकडून काम करुन घ्यायचे असेल तर त्याला उभा, आडवा न करता काम गोडीगुलाबीने करुन घेतात. मात्र,त्यांच्या भाषणात सारखे चिमटे होते. जे काम असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. जास्त बोलत नाही. कारण ते आमचे मोठे बंधू आहेत,अशा शब्दांत अजित पवार राजेंद्र पवारांना कोपरखळी मारली. बारामती येथील अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते.त्यापूर्वी
डेव्हलपमेट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणातील काही
अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाच बैठका झाल्या.मात्र कोणताही निर्णय झाला नाही, अशी तक्रार केली.प्रास्ताविकामध्ये सेंटर अँग्रीकल्चरल हाच धागा पकडून अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना, आज गडी लय जोरात आहे.बंधुराज नोंद घेतलेली आहे एवढेच सांगतो,अशा शब्दांत कोपरखळी मारली.अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन सभागृहात चांगलाच हशा पिकला.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी घेतली फिरकी
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हाच धागा पकडत अजितदादा आणि
राजेंद्र पवार यांनी तुम्ही दोघांनी आधी ठरवा
आणि मग माझ्याकडे या आपण ते काम करण्याचा प्रयत्न करु दादांनी आडकाठी आणली तर आपण पवार साहेबांकडे जाऊन ते काम करु असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
No comments:
Post a Comment