माळेगाव मधील मुलीची सासरच्या मंडळींनी केलेल्या कृत्यामुळे महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षाकडून तिला मानसिक व कायदेशीर आधार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 27, 2021

माळेगाव मधील मुलीची सासरच्या मंडळींनी केलेल्या कृत्यामुळे महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षाकडून तिला मानसिक व कायदेशीर आधार..

माळेगाव मधील मुलीची सासरच्या मंडळींनी केलेल्या कृत्यामुळे महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षाकडून तिला मानसिक व कायदेशीर आधार..                                                                                                           बारामती:- माळेगाव येथील सौ रेश्मा अहिरे या नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केले होते याबाबत बारामती तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या सर्व प्रसंगांमध्ये मुलीची सासरच्या मंडळींनी केलेल्या कृत्यामुळे ती पूर्णपणे असुरक्षीत भयभीत जाणवत होती ही सर्व परिस्थिती बघता तिला मानसिक व कायदेशीर आधाराची अत्यंत गरज होती या सर्व प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश चिटणीस तथा महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा एडवोकेट सौ रेखाताई चव्हाण यांनी या महिलेची बारामती येथे जाऊन तिच्या घरी भेट घेतली व तिला मानसिक व कायदेशीर आधार दिला ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले  व पूर्णपणे कायदेशीर मदत करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त श्री मच्छिंद्र जी चव्हाण साहेब महासंघाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष तथा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे  v.j.n.t विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव बारामती शहर काँग्रेसचे युवक अध्यक्ष योगेश महाडिक बारामती तालुका v.j.n.t काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा वडार समाजाचे युवा नेते सुरज भोसले बारामती काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सुशांत सोनवणे रेश्मा अहिरे यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते

No comments:

Post a Comment