सोनगाव प्रकरणात दोन्ही बाजूने अद्यापही गुन्हा दाखल नाही या प्रकरणाची C I D यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची व प्रकरण अनुसूचित जमाती आयोगात दाखल करण्याची विविध संघटना करणार मागणी. .
बारामती : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच एका सभेत अवैद्य धंदे बंद करण्याचा सूचना दिल्या होत्या या अनुशंगाने बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे तालुक्यात व शहरात धाड सत्र सुरू आहे याच अनुषंगाने बारामती तालुक्यातील सोनगाव येथे धाडी साठी उपविभागीय अधिकारी यांचे पथक गेले असता मंगलेश भोसले हा पोलिसांच्या भीतीपोटी पळून जात असताना नदीत पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनीच मंगलेश भोसले याला मारल असल्याचे त्याच्या तेथील प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी व नातेवाईक यांनी बोलताना ऐकावयास येत आहे, तसे सगळीकडे बोलले जात आहे.मयत मंगलेश भोसले या अनुसुचित जमाती चा आहे तो शेळ्या चरत होता पोलिसांना त्याच्या कडे येताना पाहिल्या वर तो शेळ्या सोडून धावू लागला पोलिसांनी त्याला पकडल्या वर त्याला मारहाण करीत असताना त्याच्या डोक्याला मार लागल्या मुळे व पाण्या मध्ये पडल्या मुळे त्याचा मृत्यू झाला असंल्याचे समजताच याला काय झालं असे विचारणा केली असता संतप्त जमावाने पोलिसांना मारहान करायला लागले पोलिसांवर हल्ला होतोय पाहता पोलीस पळून गेले असे सांगितले जात आहे, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनीच मारले असल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार मयताचा भाऊ हा एका शिक्षक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यालादेखील एका बड्या नेत्याने आपल्या बंगल्यावर बोलवत सदर प्रकरण थांबविण्याचे सांगितले जात आहे तसेच मयताच्या कुटुंबातील एकाला नोकरीला लावतो असे आश्वासन देण्यात आले आहे अशी चर्चा सुरू आहे सदर प्रकरण दाबल्याचा चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.
यामध्ये भोसले यांच्या नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप होत असून याबाबत अद्यापही त्यांची फिर्याद दाखल नाही कालच मयताची बॉडी ताब्यात घेत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला,यामुळे आता पारधी समाजातील काही प्रमुख अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाखल करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तसेच या प्रमुखांकडून सदर प्रकरणाची C I D कडून सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली जाणार असल्याचे सांगितले आले आहे.यातूनच जय भीम चित्रपटातील कथानकाप्रमाणे बारामती तालुक्यातील सोनगाव मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे की काय अशी चर्चा देखील चौका चौकात रंगू लागली आहे तर भटके विमुक्त आदिवासी महासंघ यांच्या वतीने मुंबई व दिल्ली पर्यंत या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले गेले. *... सोनगाव मधील घटना घडल्यानंतर संतप्त पारधी समाजाचा जमावाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहयोग भवन येथील निवासस्थाना समोर रात्री उशिरा पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी उपस्थित मृताच्या नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना पीएम रिपोर्ट मध्ये जो अहवाल येईल त्या प्रमाणे गुन्हा दाखल होईल असे सांगण्यात आले.*
No comments:
Post a Comment