बारामती (दि:१४):- मा.केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत होलार समाजाच्या वतीने वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान हा उपक्रम (दि:१३) रोजी अनंत आशा नगर येथे राबविण्यात आला.
आजच्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जपत शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. होलार समाज हा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो. आणि या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पुन्हा एकदा होलार समाजाने सामजिक बांधिलकी जपली असल्याचे प्रतिपादन अँड धीरज लालबिगे यांनी केले.
आयोजित कार्यक्रमामध्ये नगरसेवक कुंदन लालबिगे, अँड. धीरज लालबिगे, बळवंत माने, भारत देवकाते, बाळासाहेब जाधव, गोरख पारसे, सेवक अहिवळे, साजन लालबिगे यांच्या हस्ते पवारांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी बाळासाहेब देवकाते, ईश्वर पारसे, शेखर अहिवळे, राजाभाऊ माने, अक्षय माने, महादेव जाधव, सदाशिव गुळवे, सनी आवटे, अर्जुन चौगुले, छगन गोरे या सह होलार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार पत्रकार सुरज देवकाते यांनी मानले
No comments:
Post a Comment