आंबी खुर्द ते मोरगाव, जळगाव सुपे, कऱ्हावागज मध्ये कऱ्हा नदीवर वाळू माफियांची सत्ता, महसूल प्रशासन वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश आल्यावरच करतात कारवाई.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 16, 2021

आंबी खुर्द ते मोरगाव, जळगाव सुपे, कऱ्हावागज मध्ये कऱ्हा नदीवर वाळू माफियांची सत्ता, महसूल प्रशासन वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश आल्यावरच करतात कारवाई.!

आंबी खुर्द ते मोरगाव, जळगाव सुपे, कऱ्हावागज मध्ये कऱ्हा नदीवर वाळू माफियांची सत्ता, महसूल प्रशासन वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश आल्यावरच करतात कारवाई.!
बारामती :- तालुक्यातील कऱ्हा नदीपात्रात असणार्या बेसुमार वाळूचा लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही.मात्र,यानंतरही कऱ्हा नदीपात्रातुन आंबी खुर्द,मोरगाव, सुपा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या सर्रासपणे वाळूची तस्करी सुरू आहे तसेच सोनगाव,झारगडवाडी,डोरलेवाडी,मेखळी, निरा वागज, खाडज,बऱ्हाणपूर,गोजुबावी, उडवंडीसह अनेक भागात वाळू माफियांनी धुडगूस घातला आहे याबाबत सविस्तर लवकरच प्रसिद्ध होईलच पण आंबी खुर्द मधील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या एक ट्रँक्टर वाळूचा दर ५ ते ७ हजार रुपये सुरू आहे.आंबी खुर्द परिसरातील कऱ्हा नदीपात्रात असणार्या वाळू साठ्यांचे लिलाव झालेले, नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू वाहतूक सुरू आहे.त्यामुळे ही वाळू कुठून येत आहे. हे मात्र समजण्यापलीकडे आहे.असे असताना तालुक्यातील आंबी खुर्द मधून वाळूची तस्करी जोमात सुरू असून,यामुळे महसूल विभागाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत
आहे. त्यामुळे ते छातीठोकपणे सबकुछ मॅनेज
असल्याचे सांगत आहे.यामुळे आता पुणे
जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा खनिकर्म अधिकारी याकडे लक्ष देऊन वाळू तस्करी करणार्यांवर संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत कारवाई साठी प्रस्ताव तयार करणार असल्याचे समजते, जेणेकरून वाळू तस्करीला आळा बसू शकतो. त्यामुळे
आंबी खुर्द मध्ये वाळूची तस्करी करणार्यांवर संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत कारवाई होणार का ? हे पाहणं देखील औतूसक्याच ठरणार आहे.मध्यरात्र ते पहाटे सकाळी ही वाळू
वाहून नेली जाते,असे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगितले जाते. तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण ? असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात होता मंडल अधिकारी व तलाठी याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले.वाळू तस्करी करताना वाहने पकडणार्या कर्मचार्यांना त्यांचे वरिष्ठ
अधिकारीच तो आपला माणूस आहे,कारवाई करू नका असे सांगून कारवाई न करण्याचा सल्ला देतात.त्यामुळे कनिष्ठ अधिकार्यांचा सुद्धा पर्याय नसतो.अशी दबक्या आवाजात चर्चा देखील महसूल विभागाच्या कनिष्ठ अधिका-्यांकडून होताना दिसत आहे.मागील दोन-तीन
महिन्यांपासून आंबी परिसरात वाळूची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून,त्यांच्याकडील वाहनांची संख्या देखील दुप्पट झाली आहे.तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीची
तस्करी सुरळीत आहे.आंबी खुर्द मध्ये सध्या वाळूची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून,ते "मॅनेज" है ची भाषा करीत आहे.नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. महसूल विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने
वाळू तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घातल्याने कारवाईस सुरुवात झाल्याचं कळतंय,मात्र महसूल विभागाचे अधिकारी केवळ नाममात्र कारवाई करून मोकळे होण्यातच धन्यता मानत आहे.त्यामुळे
वाळू तस्करांना मोकळे रान आहे.वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल केला जात आहे.आंबी खुर्द,मोरगाव, जळगाव सुपे मधील वाळू तस्करीत राजकारणाशी संबंधित काही जण वाळू तस्करीत सहभागी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत होती परंतु आत्ता विश्वास वाटत आहे की कडक कारवाई होईल.

No comments:

Post a Comment